अमडापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांची अशीही समाजसेवा..

0
IMG-20260527-WA0015

चिखली (निलेश कोल्हे ) तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले व आपल्या कार्यातून थोड्याच कालावधीत परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दबंग अधिकारी श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत साहेब यांची अशीही समाजसेवा केली आहे.ठाणेदार राजपूत साहेब यांची मातोश्री कै.गंगाबाई पदमसिंह राजपूत (सिसोदिया) यांच्या 5 वे (पुण्यस्मरण) स्मृतिप्रित्यर्थ सेवा संकल्प प्रतिष्ठान, पळसखेड सपकाळ येथे दि.२६/०५/२०२६ रोजी अन्नदान कार्यक्रम आयोजन करून गरजू व उपेक्षित लोकांना जेवण दिले.. या कार्यातून समाजाने दुर्लक्षित घटक असलेले व सेवा संकल्प येथे आश्रयास असलेले लोकांना आमच्याकडून सेवा घडली.. व आमच्या मातोश्री यांच्या स्मृतिपित्यर्थ अन्नदान करण्यात आले.. ठाणेदार जयसिंग राजपूत साहेब यांनी केलेल्या या कार्याबद्दल समाजात व परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहेत.. यापूर्वीही त्यांनी शेतकरी, परिसरातील गरीब जनता यांच्यावरील अन्यायाबाबत परखड भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांना सलाम..डॉ.पालवे व सेवा संकल्प प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!