राज्यातील आयुष रुग्णालयातील नियमित पद निर्मितीला आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ट्रामा केअर सेंटर, चिखली उपजिल्हा सामान्य रुग्णालय आणि साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयातील पद निर्मितीला राज्य शासनाची मान्यता..केंद्रीय आयुष आरोग्य व प्रमुख कल्याण राज्यमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश…

0
Screenshot_2026-03-06-06-51-24-15_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज )राज्यात पुणे, नंदुरबार , अहिल्यानगर ,सिंधुदुर्ग येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष रुग्णालयातील नियमित पदांना तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील ट्रॉमा केअर सेंटर चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय आणि साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयातील पदांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे …नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने आरोग्य सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत आहे मनुष्यबळ वाढवून ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्यसेवा देण्या साठी राज्य सरकारच्यावतीने 259 आरोग्यसंस्थेसाठी आवश्यक पदाच्या आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीने नवनिर्मित श्रेणी वर्धित रुग्णसंस्थेसाठी पदनिर्मिती करण्यात मान्यता देण्यात आली आहे .शिवाय राज्यातील पुणे नंदुरबार अहिल्यानगर सिंधुदुर्ग येथे सुरू करण्यात आलेल्या 30 खटांच्या आयुष रुग्णालयातील नियमित पद भरतीला मान्यता देण्यात आली आहेशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे नवीन ग्रामीण रुग्णालतील नव्याने पद निर्मितीला तसेच नवीन बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोताळा तालुक्यातील कोथळी केंद्राच्या पदनिर्मितीला राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे राज्यात सह बुलढाणा जिल्ह्यात हे आरोग्य विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात नियमित पदभरती आगामी काळात होणार आहे राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागामध्ये नियमित पदभरतीला मान्यता देण्यात आल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत केंद्रीय आयुष , आरोग्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे राज्यातील आरोग्य विभागात नव्याने नियमित पदभरती व्हावी यादृष्टीने राज्य शासनाची समन्वय साधून होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे राज्य शासनाच्या वतीने 24 जून रोजी 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणी वर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे आगामी काळात आरोग्य विभागात ही पदभरती होणार असल्याने अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!