समृद्धी महामार्गावरून अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई! लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्या कारवाईने रेती माफियाचे धाबे दणाणले
लोणार (यासीन शेख): लोणार मौजे तालुका लोणार येथून समृद्धी महामार्गावरून बॅरिकेट्स तोडून चोर मार्गाने मौजे धानोरा येथे अवैध रेती वाहतूक करत असलेले तीन टिप्पर पकडण्यात आले. प्रत्येकी 2 ब्रास प्रमाणे एकूण 6 ब्रास रेती वाहतूक होत होती. ही कारवाई महसूल विभाग, लोणार आणि पोलिस विभाग मेहकर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की समृद्धी महामार्गावरील बॅरिकेट तोडून अवैद्य रेती वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती लोणार तहसीलदार भूषण पाटील यांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
त्यांनी आपल्या सहकार्यासोबत समृद्धी महामार्ग लगत सापळा रचत अवैध रेती वाहतूक करणारे वाहनाचा पाठलाग करत रेतीमाफीयाच्या मुसक्या आवडळ्या.
ही धडक कारवाई तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये निवासी नायब तहसीलदार आर. एम. डोळे, नायब तहसीलदार मयूर इप्पर, मंडळ अधिकारी जे. एम. येऊल, पी. आ. डोईफोडे, सुधीर हाणवते, डी. एस. साळवे, ग्राम महसूल अधिकारी मंदार तनपुरे, मोहम्मद परसुवाले गोपनीयविभाग पोलीस आणि महसूल सहायक भगवान मुसळे हे अधिकारी उपस्थित होते.सदर वाहनांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली असून, पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी टिप्पर वाहने तहसील कार्यालयात अडकवून ठेवण्यात आली आहेत.या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, महसूल विभागाच्या या ठोस पावलाचे परिसरात कौतुक होत आहे.
■ रात्रीचा फायदा… पण तहसीलदारांची दबंग कारवाई!
अवैध रेती तस्करांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समृद्धी महामार्गावरील बॅरिकेट तोडून चोर मार्गाने रेती वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने यावेळी सजगता दाखवत धडक कारवाई केली.अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अवैध रेती वाहतूक रोखण्यात यश मिळाले असून, हे वाहन तहसील कार्यालयात अडकवले गेले. ही कारवाई परिसरातील इतर रेती तस्करांसाठी धडा ठरली आहे.
