चिखली अर्बन देऊळगाव मही शाखेकडून खराब नोटा स्वीकारण्यास नकारघंटा!खातेदारास पाठविले परत? चिखली अर्बन अध्यक्ष यांच्याकडून टोलवाटोलवी!
दे/राजा (एकनाथ माळेकर)देऊळगाव मही येथील चिखली अर्बन शाखेत अंढेरा येथील कॅश क्रेडिट खाते धारक यांनी थोडेफार खराब असलेले पैसे भरण्यासाठी बँकेत गेले असता बँकेने पैसे घेण्यास नकार दिल्याने त्यानां परत पाठवल्याने रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाने ठरवुन दिलेल्या नियमाची पायमल्ली होत आहे. सदर प्रकाराबाबत प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी चिखली अर्बन बँकेचे सर्वेसर्वा सतीश गुप्ता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अंढेरा येथील सुखदेव दत्तात्रय सानप यांचे वय ५० वर्षे अपघाती अपंगत्व आलेले ग्राहक यांचे चिखली अर्बन बँक शाखा देऊळगाव मही येथील शाखेत मागील दहा वर्षांपासून नियमीत कॕश क्रेडिट खाते असुन कुठलीही थकबाकी नाही. दि.१६ जुलै २०२५ रोजी ते आपल्या कॅश क्रेडिट खात्यात दहा हजार शंभर रुपये भरण्यासाठी शाखेत गेले असता पैसे भरण्याची स्लिप ज्यामध्ये पाचशे रुपयांच्या वीस नोटा आणि दहा रुपयांच्या दहा असे एकूण दहा हजार शंभर रुपये भरुन पैसे कॅशियरकडे दिले.त्यांनी त्यांतील पाचशे रुपयांच्या वीस नोटा जमा करुन घेतल्या व उर्वरित राहिलेल्या दहा रुपयांच्या दहा नोटा एकुण शंभर रुपये ह्या नोटा फाटक्या आहेत.आम्ही त्या घेत नाही.किंवा जमा सुध्दा करुन घेत नाही.आम्ही मागील दोन वर्षांपासून दहा रुपयांच्या नोटा घेतल्या पण नाही आणि ग्राहकांना दिल्या पण नाही.याबाबत सुखदेव दत्तात्रय सानप यांनी तुम्ही आम्हाला तसे लेखी द्या असे म्हटले असता आम्ही तुम्हाला लेखी देणार नाही.तुम्हाला कुठे जायचे?काय करायचे कुठेही तक्रार करा ?अशी उध्दट व हेकेखोर पणाची वागणुक रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक श्री राठोड यांच्या कडुन ग्राहकांना मिळत असुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवुन दिलेल्या नियमांची संबंधित चिखली अर्बन बँकेकडुन भर दिवसा पायमल्ली होत असुन सर्व सामान्य नागरिकांची,ग्राहकांची बॅकेकडुन पिळवणूक होत आहे.यामुळे अनेक सर्व सामान्य ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असुन
तरी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अग्रणी बॅकेचे जिल्हा व्यवस्थापक यांनी अशा रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.अशी मागणी होत आहे.
चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांच्याकडून टोलवाटोलवी
सदर प्रकाराबाबत चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्ता यांना भ्रमणध्वनी द्वारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधत प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी देऊळगाव मही येथील शाखेत घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता तक्रारकर्ते यांच्या सोबत वरील प्रकार घडलाच का ?तसेच तुम्हाला काय छापायचे ते छापा असे म्हणुन त्यांनी संपर्क तोडला.एकदरीतच या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे
