मुरादपूर येथे वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांची उंटावरून मिरवणूक…
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मुरादपुर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरादपुर येथे आजपासून शाळेला सुरुवात तर नविनच प्रवेश असणार्या वर्ग 1पहिली मधे आपल्या जिवनात शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थी व पालक यांचा शालेय व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार करण्यात आला तर विद्यार्थी यांची वाजत गाजत उंचावरुन मिरवणुक काढण्यात आली व लक्ष्मीच्या पावलांनी त्यांना विद्येच्या मंदिरात प्रवेशोऊत्सव साजरा करुन प्रवेश करण्यात आला तरी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळां व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुखदेव गाडेकर व उपसरपंच ग्रा प मुरादपुर विष्णु महाराज गाडेकर सिध्देश्वर गाडेकर रतनभाऊ गाडेकर व्यवस्थापन समीती सदस्य यांनी परिश्रम घेतले
व कार्यक्रमासाठि गावातील नागरीकांची उपस्थित होती व मा मुख्याध्यापक व विजय गवई सर सतीशजी बेलोकर सर सुरेंद्र जाधव सर सचिन वाळेकर सर यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहणत घेतली तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व आजपासून शाळेला आनंदमय सुरूवात झाली तरी सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थी व पालकांच्या चेहर्यावर आनंद पहायला मिळत आहे
तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहणत घेणार्यांचे व पालकांचे मुरादपुर उपसरपंच विष्णु महाराज गाडेकर यांनी आभार मानले
