कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यास लुटणारे जिल्हा वाहतूक पाचही पोलीस निलंबीतजिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची कारवाई .बुलढाणा वाहतुक पोलिस यांचा प्रताप थांबत थांबेना
Oplus_16908288
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली येथुन मलकापूरकडे जात असलेल्या कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यास बुलढाणा जिल्हा पोलीस वाहतूक पोलिसांनीच लुटल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणात दखल देवून बुलढाणा पोलिस दलातील पाचही दरोडखोर पोलीस कर्मचाऱ्यांना ७ ऑगस्ट रोजी निलंबित केले आहे तसेच पाचही पोलीस कर्मचाऱ्यां विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा वाहतूक पोलीस यांचे यापूर्वीचे सुद्धा अनेक कारणामे बुलढाणा माझा यांनी या पूर्वी सुद्धा उघड केले होते परंतु त्याचे कोणतेही सोयरसतूक जिल्हा वाहतुक पोलिसांना वाटले नाही त्यांनी जर तयाच वेळेस त्यांच्यावर कारवाई केली असती तर आता त्यांनी हे कारनामे केले नसते परंतु या पूर्वी जिल्हा वाहतूक पोलीस यांच्या कडे वरिष्ठ अधिकारी यांनी झाकन टाकले होते त्यामुळे जिल्हा वाहतूक पोलीस यांनी हे कारणानामे सुरूच ठेवले जर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी त्याचवेळी जिल्हा वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई केली असती तर आज जिल्हा वाहतूक पोलीस यांनी कारणामे केले नसते.

या देवन घेवान घडामोडींमुळे तक्रारदाराचे वाहन अनियंत्रित होऊन अपघात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पो.ह 1198 गजानन भंडारी
वाहतूक नियंत्रण शाखा, बुलढाणा, पोकॉ. 2544 अभय टेकाळे पो.स्टे. चिखली, पो.हवा.819 विठ्ठल काळुसे महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर, पोकॉ. 1069 संदीप किरके महामार्ग पोलीस मदत केंद्र, मलकापूर, पोका 306 विजय आंधळे पोलीस मदत केंद्र, मलकापूर यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. महामार्ग
तसेच पाचही पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही कर्मचाऱ्यांच्य निलंबनाचे आदेश ७ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जारी करण्यात आले आहे. तसेच निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
कर्नाटक राज्यातील ताज अब्दुल रहेमान वय २३ वर्ष यांनी
चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारी नुसार, बुलढाणा बायपास रोडवर जिल्हा वाहतुक पोलिसांनी त्यांच्या वाहनाची अडवणूक करून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पेटीएमद्वारे १५०० रुपये घेतले. त्यानंतर इतर तीन पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या एअर रायफलवर कारवाई न करण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

