महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना संतोष भुतेकर व सचिन कदम यांनी अवैध रेती तसेच महसूल च्या बदल्यातील भोंगळ कारभारा संदर्भात दिले निवेदन,..

IMG-20250809-WA0040

बुलढाणा (एकनाथ माळेकर) बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती विरोधात आवाज उठवणाऱ्या पैकी संतोष भुतेकर यांचं नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला सळो की पळो करून सोडणाऱ्या तसेच प्रत्येक आंदोलनातून काही ना काही कारवाई घडवून आणणाऱ्या त्यांच्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र आहे रेती त्यांच्या मार्गावरून सध्या बंद असली तरी रेती माफिया ओपन चुकून रेती काढण्याचा प्रयत्न करतातच शिवाय इतर अनेक मार्ग शोधून त्या मार्गाने रेती काढण्याचा सिलसिला खडकपूर्णा प्रकल्पात अजून सुरूच आहे गेल्या दोन महिन्यापासून तक्रार नाही तर प्रशासनाने एकदाही एनडीआरएफ ची टीम धरणात उतरवली नाही यातून जिल्हा प्रशासनाची कारवाई करण्याची मानसिकता नाही फक्त आंदोलन केले किंवा कोणी कारवाई करण्यास भाग पाडले तरच कारवाई करायची हीच जिल्हा प्रशासनाची मानसिकता आहे अशा अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी त्यांच्यावर रीतसर कारवाई करावी तसेच खडक पूर्ण प्रकल्पातून होणारा अवैध रेती उपसा तात्काळ थांबवावा व जिल्ह्यात 2025 या वर्षात झालेल्या महसूल बदल्यात झालेली अनियमत्ता संदर्भात अपर आयुक्त यांच्या नेतृत्वात समिती नेमून चौकशी करण्यात यावी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जिल्ह्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने केल्या अशा तऱ्हेचे निवेदन दिले. प्रसंगी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकारी यांना खडे बोल सुनावले आम्ही गतिमान सरकार म्हणतो परंतु या जिल्ह्यात काय चालले आहे ह्या भोंगळ कारभाराला तुम्हीच जबाबदार आहात हे असे चालणार नाही आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारचे खडे बोल जिल्हा अधिकारी यांना सुनावल मला कारवाई लागेल असे आदेश दिले…
विशेष म्हणजे संतोष भुतेकर व सचिन कदम या दोघांना निवेदन देण्यासाठी जाऊ नये म्हणून अटकाव करण्यात आला परंतु ते त्यांच्या मागणीवर ठाम असल्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांना दिवसभर ताब्यात ठेवून कुठलेही उपतव्यापी आंदोलन किंवा हरकत करू नये म्हणून पोलीस संरक्षणातच निवेदन द्यावे लागले

You may have missed

error: Content is protected !!