जन्मनोंद किंवा नोंदणी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांचे हाल,टेबल संख्या वाढून द्या – शेख समद शेख अहमद
लोणार (यासीन शेख) : लोणार नगर पालिकेतून जन्म नोंदणी किंवा “जन्म नोंद नाही” दाखला मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तब्बल आठ ते दहा कागदपत्रे सादर करूनही महिनाभर नगरपालिकेची पायरी चढावी लागते. याकडे मुख्यअधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचारी वाढून तात्काळ दाखले देण्याची सोय करावी अशी मागणी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केली आहे.
संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांचे म्हणणे असे की, दररोज मोठ्या प्रमाणात जन्म नोंदणी व दाखल्यांच्या मागण्या येतात आणि ऑनलाइन प्रक्रियेमधून केवळ पाच ते सहा दाखलेच रोज निघतात. मात्र, या परिस्थितीकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप त्यांनी केलाय
मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्तिगत लक्ष देऊन कर्मचारी व टेबलांची संख्या वाढवावी जेणेकरून दाखले वेळेत मिळतील आणि जनतेचा त्रास कमी होईल.
शहरापासून नगरपरिषद कार्यालय तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने, नागरिकांना ये-जा करण्यासाठी ऑटोवाल्यांना किमान ८० ते १०० रुपये द्यावे लागतात. परिणामी, गरीब व सर्वसामान्य नागरिकांना एकाच दाखल्यासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागतात यामध्ये त्यांना मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय ,आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे तरी याकडे मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा काँग्रेसच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद यांनी दिला आहे.
