कृषी पर्यवेक्षक दांडी बहाद्दर, शरद पवार यांची कारणामे उघड….
सिंदखेडराजा( एकनाथ माळेकर) सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे पिंपळगाव सोनरा सवडद येथे कार्यरत कृषी पर्यवेक्षक शरद पवार नामक अधिकारी शरद पवार गत पाच वर्षांपासून शासनाचा फुकट पगार घेऊन बेपत्ता असून आज प्रचंड अतिवृष्टी झाली असताना देखील शेतकऱ्यांचे प्रती अजिबात सहानुभूती न दाखवता ऐवढ्या संकटात देखील ते कर्तव्यावर हजर झाले नाही. या पूर्वी सुद्धा त्यांच्याविषयी पिंपळगाव सोनारा येथील ज्ञानो डीपी विषयी तक्रारी झाल्या होत्या परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही या मगे कोणाचे वरदहस्त आहे व मेहरबानी आहे हे सुद्धा लक्षात येत नाही या प्रकरणी प्रभारी कृषी अधिकारी सीनगर यांना विचारणा केली त्यांनी शरद पवार कर्तव्यावर हजर झाल्याची पाठराखण केली दरम्यान सरपंच यांना कॉन्फरन्सवर घेतले असता शरद पवार अजिबात आले नसल्याचे स्पष्ट झाले ते सीनगर यांनी मान्य करीत परत पवार हे हलगर्जीपणा अजिबात करीत करीत नाही, तक्रारी यायला हव्यात असे स्पष्टीकरण दिले. तथापि सीनगर हे देखील जबाबदार आहेत. त्यांनी तरी शरद पवार सारख्या निगरगट्ट, कामचुकार अधिकाऱ्यावर वचक ठेवला आहे का? कुठे शेतकऱ्यांची लूट होत आहे? कोठे खत अवाजवी दरात विकल्या जात आहे? याची कधी स्वतः माहिती घेतली आहे का? हुमणी अळीचा सर्विवे केला नाही शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन कागदी घोडे नाचविणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या सबंधित प्रभारी कृषी अधिकाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. कृषी विभागाचे काम पोलीस प्रशासन करीत असले तरी शरद पवार यांना शोधून आणल्यास आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. सीनगर यांच्या म्हणण्यात शरद पवार नावाचा चंद्र दि १० अॉगस्ट रोजी सवडदला उगवणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी या पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या (कधीच फोन उचलत नसलेल्या ) कृषी पर्यवेक्षक शरद पवार यांच्या स्वागतास आवर्जून उपस्थित राहावे. ते नाही आले तर परवा कृषी अधिकारी सीनगर सिंदखेडराजा, जिल्हा कृषी अधिकारी ढगे यांच्या साठी आकर्षक हार घालून स्वागत करण्यात येणार
