शेतकरी कमलबाई माने यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिंदखेडराजात काढण्यात आला मोर्चा,शेतकरी कमलबाई माने यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मंत्रालयावर जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा…..

IMG-20250811-WA0051

सिंदखेडराजा( बुलढाणा माझा न्युज)सिंदखेडराजा येथील शेतकरी कमलबाई माने यांच्या मालकीच्या व ताब्यातील शेतामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता उभ्या पिकात जेसीबी घातल्याने व ताब्यात घेतल्याने शेतकरी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला तहसीलदार अजित दिवटे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की 08/08/2025 सकाळी सात वाजेला सौ कमलबाई माने यांच्या मालकीच्या व ताब्यातील जमीन शेत सर्वे नंबर 37/ 38 39/3 स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना किंवा नोटीस न देता शेताचे लोखंडी तार कंपण, लोखंडी गेट, शेतातील सोयाबीन भुईमुग उडीद व इतर उभे पिक जेसीबी लावून उध्वस्त केले आहे, सदर शेतामध्ये रोही व इतर वन्यप्राण्याच्या बंदोबस्त साठी पाच लाखाचे कुंपण करण्यात आले होते व सोयाबीन पीक आज रोजी फुले व शेंगा यांचा बहर व पीक काढण्याच्या तोंडावर आले असता सार्वजनिक बांधकाम विभागाला आपल्या संमतीने ताबा मिळवून दिला आहे,

आज आमच्या कुटुंबाबर उपासमारीची वेळ आली असून आपण आमच्या उभ्या पिकात जेसीबी घालून पिकाचे व कुंपणाचे एकूण कमीत कमी दहा लाखाचे नुकसान केले आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबाला आमच्या जमिनीचा ताबा व नुकसान भरपाई परत देण्यात यावी, जर मला दिनांक 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण ताबा दिला नाही तर आम्ही संपूर्ण कुटुंब 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मंत्रालयावर जाऊन आत्मदहन करणार आहोत, तसेच आपण कोणत्या कागदपत्राच्या आधारे बांधकाम विभागाला परवानगी दिली आहे, त्याचे पत्र व (मराठा सेवा संघाला शंभर वर्षाच्या लाजवर दिली आहे, असे समजते) दिली असल्यास किती रुपयाच्या बॉण्डवर दिली आहे, त्या संदर्भात व पैसा भरण्याची स्लिप अशी संपूर्ण माहिती आज देणे, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे तसेच मोर्चा संपल्यानंतर शेतकरी व मान्यवरांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय खडसे यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली या या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना शेतकरी व शहरवासीय मध्ये माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे माजी नगराध्यक्ष सतीश तायडे माजी उपनगराध्यक्ष विजय तायडे शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे शेतकरी नेते दिलीप चौधरी भारतीय जनता पार्टीचे नेते अशोकराव मेहेत्रे भाजप शहराध्यक्ष संदीपराव मेहेत्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते योगेश मस्के व्यापारी बाळासाहेब शेवाळे तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!