मेरा बू सर्कलमधील रस्त्यांची दुरावस्था; स्वातंत्र्यदिनी शेकडो नागरिकांसह करणार उपोषण ………….. गजानन वायाळ

IMG-20250721-WA0031

चिखली (एकनाथ माळेकर) मेरा बू जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक महत्त्वाचे रस्ते अत्यंत खराब स्थितीत आहेत. रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन संतोषराव वायाळ यांनी ३० जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.दुरुस्तीची मागणी असलेले प्रमुख रस्ते असे –रोहडा फाटा – तपोवन देवी रस्ता, भालगाव – रोहडा रस्ता, मेरा खुर्द – साखर खेर्डा रस्ता, मेरा बू फाटा – गाव रस्ता, आणि मेरा बू – पिंपळगाव सोनारा रस्ता हे रस्ते रोहडा, मेरा बू, कवठळ, अंत्री खेडेकर, मनुबाई यांसारख्या गावांना जोडणारे महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यामुळे आज स्थानिक नागरिकांनी तहसीलदार, चिखली यांना निवेदन देऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.निवेदनानुसार, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर झेंड्याखाली बसून १ दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!