घरकुल परिसरातील पुलाचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन

IMG-20250813-WA0000

लोणार: (यासीन शेख)लोणार नगरपरिषद नवीन घरकुल भागातील दोन ब्लॉकला जोडणाऱ्या सदर पुलाचे काम मागील दोन महिन्यापासून रखडले आहे.परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठमोठे दगड उघडे पडले असून दुचाकी ऑटो अपघात सतत घडत असून सदर पुलाचे काम मुरूम अभावी बंद करण्यात आले आहे.तरी तात्काळ सदर पुलाचे काम सुरू करण्यात यावे अन्यथा सात दिवसात काम सुरु न झाल्यास शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शे. रफिक शे. जाफर यांनी निवेदनाद्वारे नगर परिषद लोणारला दिला.या निवेदनात किशोर दिनकर बाजड, शेख मुक्तार शेख दाऊद, तेजराव दीपक तारे,सय्यद सलीम सय्यद शौकात,शेख सद्दाम, शेख रहमान शेख युसूफ,शेख दस्तगीर शेख जाफर, सय्यद इसाक सय्यद मुसा, शेख रियाज गुलाब, शेख जाहीर शेख मजीद,आकाश बाजड,शिवाजी तोडे, शेख मेहबूब, फकीरा पाटोळे सोबत बऱ्याज नागरिकांच्या सह्या आहे.

You may have missed

error: Content is protected !!