पिस्तूल व चाकू दाखवून सोन लुटलं सिदखेडराजा शहरातील घटना….

Screenshot_2025-08-13-15-42-55-03_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी)12 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेडराजा शहरातील सौ आसराबाई मुंडे व त्यांच्यासोबत महिला सिंदखेडराजावरून जालना रोडवरील मोठा महादेव येथे श्रावण मास निमित्त दर्शन साठी जात असताना अचानक समोरून जालना रोड वरून चार चाकी वाहनातील लोकांनी महिलांना अडवलं चाकू बंदूक याचा धाक दाखवून महिला सौ आसराबाई मुंडे यांच्या नाकातील व कानातील सोने काढून घेतले मात्र आरडाओरडा केल्यामुळे चोर पळून गेले सदर घटनेमुळे सकाळी मोठा महादेव दर्शन साठी जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर विषय असा आहे की श्रावण महिना सुरू झाल्यापासून सिंदखेडराजातील अनेक महिला जालना रोडवरील मोठा महादेव मंदिर येथे पूजेसाठी जातात सकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत या मंदिरात प्रचंड गर्दी असते मात्र सौ आसराबाई मुंडे यांच्या नाकातील व कानातील सोने चोरांनी बंदूक व चाकू दाखवून हिसकावून घेतल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले सदर घटनेची माहिती मिळतात सिंदखेडराजा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सानप व त्यांचे सहकारी यांनी चोरांचा शोध सुरू केला चिंचोली जहागीर येथे चोरांची गाडी पकडण्यात आली मात्र त्या गाडीतून चोर पसार झाले चोरांचा शोध अद्यापही सुरू आहे पोलीस अधिकारी सानप व त्यांचे सहकारी चोरांचा शोध घेत आहे.

You may have missed

error: Content is protected !!