अकोल्याहून संभाजीनगर ला जाणारी लाल परी रस्त्यातच बंद
सिंदखेडराजा(शहर प्रतिनिधी) आज सकाळी नागपूर मुंबई हायवे वरती सिंदखेड राजा या ठिकाणी अकोल्याहून संभाजीनगरकडे जाणारी लाल परी रस्त्यातच बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.
ही बस नियमित वेळेनुसार दोन ते तीन तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांचे कामे खोळंबली आहे. अशा घटना नेहमीच घडत असतात. तरी डेपो मॅनेजरचे काम आहे की बसची वेळोवेळी तपासणी करून घेणे अशा घटना घडू नये म्हणून अशा गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच ही बस मेन रोड मध्येच बंद पडल्यामुळे इतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. अशा घटनांमुळे लाल परी बसच्या बाबतीत प्रवाशांची नाराजी दिसून येत आहे.
