महसूल विभागातील ई-सेवा केंद्राशी निगडीत प्रलंबित कामासंदर्भात दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी विशेष मोहीम राबविण्यांत येणार आहे तरी शेतकरी बांधव व लाभार्थी यांनी कामे पूर्ण करून घ्यावी असे अहवान श्री संतोष काकडे तहसीलदार चिखली यांनी केले आहे…..
चिखली (एकनाथ माळेकर)महसूल विभागामार्फत शेतकरी व सामान्य जनतेची निगडीत विविध योजना राबविण्यांत येतात. या योजना विहित वेळेत व कोणत्याही तांत्रीक अडचणी शिवाय गरजू नागरीकांपर्यंत पोहचाव्यात या करीता शासनाने सर्व शेतकऱ्यांचा शेतकरी फारमर आय.डी. तयार करणे तसेच शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीचे अनुदान तात्काळ वितरीत करता यावे याकरीता त्यांचे E-KYC करणे तद्वतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरीत करण्याकरीता त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी सलग्न करणे त्याचप्रमाणे त्यांचे डीजीटल हयात प्रमाणपत्र पोर्टलवर अद्यावत करणे ईत्यादी महत्वाची कामे सद्यस्थिती युध्द पातळीवर करण्यांत येत आहेत.
सदर तांत्रीक कामे पूर्ण झाल्यास संबंधीत शेतकरी व सामान्य नागरीकांना त्यांना अनुज्ञेय असलेली शासकीय मदत कोणत्याही अडचणी शिवाय वेळेत मिळणे सुकर होईल. सदर कामे शहर व ग्राम पातळीवर ई-सेवा केंद्रा मार्फत करण्यांत येतात. चिखली तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची तसेच लाभार्थ्यांची वरील कामे प्रलंबित आहेत. अशा सर्व लाभार्थ्याची ई-सेवा केंद्राशी निगडीत प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याकरीता तहसिलदार श्री. संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी विशेष मोहीम राबविण्यांत येणार आहे.याकरीता विविध योजना निहाय प्रलंबित शेतकऱ्यांची व लाभार्थ्यांची गावानिहाय यादी सर्व संबंधीत ई-सेवा केंद्र संचालकांना पाठविण्यांत आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व ई-सेवा केंद्र संचालकांची यासंदर्भात दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी आढावा बैठक घेऊन तहसिलदार श्री. संतोष काकडे यांनी सर्व प्रलंबित कामे विशेष मोहीमेअंतर्गत तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
ज्या शेतकरी बांधवांचे व विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांचे फारमर आय.डी., ई-केवायसी व डिजिटल ह्यात प्रमाणपत्र चे काम प्रलंबित आहे, अशा सर्व नागरीकांनी या विशेष मोहीमेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावे तसेच या दोन्ही दिवशी ग्राम महसूल अधिकारी त्यांच्या गावामध्ये उपस्थित राहणार आहेत. आपली प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ई-महासेवा केंद्र व ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे व आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावी असे आवाहन श्री. संतोष काकडे, तहसिलदार चिखली यांच्याकडून करण्यांत येत आहे.
