शाळेला लॅपटॉप भेट – ‘सेवा संकल्प’चा स्तुत्य उपक्रम,ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचे नवे पर्व….
शेलोडी (बुलढाणा माझा न्युज) –निराश्रित, निराधार, मनोरुग्ण आणि अनाथांची आजन्म सेवा करण्याचे अखंड व्रत ज्यांनी धारण केले असे सेवाव्रती “सेवा संकल्प” प्रतिष्ठान (पळसखेड सपकाळ) संस्थेचे संस्थापक श्री नंदूभाऊ पालवे आणि त्यांच्या सहचारिणी सौ आरती पालवे व डॉ. साखरे साहेब यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीला न्याय देत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा,शेलोडी येथे रु. 51,000 किमतीचा नामांकित कंपनीचा लॅपटॉप भेट देऊन शैक्षणिक क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
ही भेट केवळ एक यंत्र नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील दारे उघडणारे साधन आहे. या लॅपटॉपच्या साहाय्याने –
ऑनलाईन शैक्षणिक साधनांचा वापर ,शैक्षणिक व्हिडिओ, ऍनिमेशन, ई-बुक्स ,डिजिटल प्रोजेक्ट सादरीकरणे ,स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त संसाधने ,कोडिंग, विज्ञान प्रयोगांचे आभासी मॉडेल्स
हे सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
मुख्याध्यापक व शिक्षकांची प्रतिक्रिया
“आमच्या शाळेत डिजिटल शिक्षणाचे वातावरण निर्माण होईल. शाळेतील ऑनलाईन कामे वेळेत पूर्ण होतील व ग्रामीण भागातील मुलांनाही आता आधुनिक पद्धतीने शिकण्याची संधी मिळेल, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे,” असे सांगितले.
गावातील पालकांनी हा उपक्रम गावाच्या शैक्षणिक इतिहासातील महत्त्वाचा क्षण असल्याचे नमूद केले. “आता आमच्या मुलांनाही शहरातील मुलांच्या बरोबरीने स्पर्धा करता येईल,” असे एका पालकाने समाधान व्यक्त केले.
तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजूभाऊ नेमाने , सध्याचे अध्यक्ष श्री कैलास घाडगे व उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य आणि सरपंच, उपसरपंच , ग्रा.प. सदस्य , गावातील ग्रामस्थ अमोल नेमाने ,शेषराव घेवंदे या सर्वांनी श्री नंदूभाऊ पालवे यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आणि आदरणीय नंदू भाऊंनी शाळेच्या गुणवत्तेचा चढता आलेख पाहून आपलं सुद्धा शाळेप्रती काहीतरी देणे आहे या भावनेने शाळेतील गुणवत्ता पाहून त्यांनी शाळेसाठी काहीतरी देणे लागते या भावनेतून व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करून जानेवारी महिन्यामध्ये लॅपटॉप देण्याचे आश्र्वासित केले होते आणि आज 15 ऑगस्ट 2025 ला शाळेला आपली ही अमूल्य भेट दिली.
प्रेरणादायी संदेश
“गावातील मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष तंत्रज्ञान हाताळण्याचा आत्मविश्वास मिळावा, हा आमचा हेतू आहे. ही छोटीशी मदत त्यांच्या भविष्यात मोठा फरक करू शकते,” असे श्री नंदूभाऊ पालवे यांनी सांगितले.
