नगरपालिकेच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलीची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी
सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी रवी ढवळे)स्थानिक नगर परिषद च्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त ” गोकुळ अष्टमी ” दिनांक 15/08/2025 रोजी 750 वी जयंती माऊलीच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढून हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान स्थानिक भजनी मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींची अभंगगात नामघोष करत भक्तिमय वातावरणात नगर प्रदक्षिणा त्यातुन मिरवणुक काढण्यात आली.
मुख्याधिकारी डॉक्टर आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून व निर्देशान्वये संपन्न झालेल्या या पालखी सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते आतिश भाऊ तायडे, कैलास भाऊ मैहेत्रे, स्वप्नपूर्ती शहर संघाच्या अध्यक्ष सिंधुताई मेहत्रे, सचिव तारा ताई म्हस्के, कार्यालय अधीक्षक प्रभू वाघ, सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ मस्के,राजु भाऊ आढाव, पथविक्रेता समितीचे तुळशीदास चौधरी , सहा प्रकल्प अधिकारी गजानन सरकटे,सुमित आटोळे ,दिलिप पवार, पत्रकार गजानन मेहेत्रे यांच्या हस्ते माऊलीचे पूजन करून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.
टाळ मृदंगाच्या निनादात भजन गात व हरिनाम गजर घेत दिंडी शहरातुन काढण्यात आली. सदर दिंडी संत सावता महाराज मंदीर मा.उपविभागीय कार्यालयासमोरुन त्रिकोणी पार , माणिक चौक, आढाव गल्ली , बालाजी गल्ली , संभाजी चौक राजवाडा मागे परत संत सावता महाराज मदीरा समोर येत ज्ञानेश्वर महाराजांची आरती आणि पसायदानाने पालखीचा समारोप करण्यात आला.
ह.भ. प. बाळू महाराज मस्के, शाहीर विष्णू मगर, भजनी मंडळाचे अशोक झोरे शंकर मेहत्रे, प्रताप चौधरी द्वारका चौधरी, विष्णू बर्डे, धोंडीबा हिरे ,सुमन हिरे सुलाबाई वाघ, मना बाई जाधव ,प्रकाश चौधरी, कैलास मैहत्रे, अर्जुन भोजने , अहिल्याबाई होळकर नगर मधील महिला व मुली आणि त्रिगुणी गल्लीमधील महिला भजनी मंडळाच्या ताराताई रामेश्वर मस्के, गेंदाताई बरर्डे. सिंधू मेहत्रे, आशा चौधरी, यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. पालखीचे नियोजन व आयोजन नपतील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय कुरंगळ, गंगा हरकळ विजय जाधव, राहुल चौधरी,विष्णु मगर,भगवान आढाव,किसन मेहेत्रे आदींनी परिश्रम घेतले. पालखी दरम्यान चोपदार म्हणून गणवेशात आसाराम चौधरी यांनी काम बजावले.
