बनमेरू विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिवस साजरावाचन संस्कृतीला नवा उजाळा

IMG-20250815-WA0013

लोणार (यासीन शेख) : दि. १२ ऑगस्ट २०२५ कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी भारताचे पहिले ग्रंथपाल पद्मश्री डॉ. एस. आर. रँगनाथन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश बनमेरू सर यांनी डॉ. रँगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांना ग्रंथालयाचे महत्त्व व वाचन संस्कृती बाबत मार्गदर्शन केले. ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार असून, डिजिटल युगातही त्यांचे स्थान अढळ आहे. असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके कथा कादंबऱ्या आधी विविध पुस्तकाचे एक तास वाचन केले.
प्राचार्य यांनी नविन सेवा, पुस्तके व डिजिटल सुविधा यांची माहिती दिली.व विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर मोरे सरांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!