डोंगरशेवली ग्रामपंचायत अंतर्गत हर घर तिरंगा अभियान सम्पन्न

Screenshot_2025-08-17-07-57-59-85_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

चिखली:( गजानन दसरकर )तालुक्यातील मौजे डोंगरशेवली येथे हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले.वरील विषयाच्या अनुषंगाने राज्यामध्ये दिनांक ०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या दरम्यान “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम / उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. संदर्भ क्रमांक ०१ अन्वये केंद्र शासनाच्या संस्कृती कार्य मंत्रालयाचे मा. सचिव यांनी या संदर्भात दिनांक ३१ जुलै, २०२५ रोजी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपरोक्त कालावधीत साजऱ्या करावयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम / उपक्रमांबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

“हर घर तिरंगा” अभियानाच्या अनुषंगाने, दिनांक ०० ऑगस्ट, २०२५ रोजी मा. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. दिनांक ०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२५ या दरम्यान वेगवेगळ्या विभागांनी/कार्यालयांनी करावयाच्या कार्यवाहीचा तपशील या बैठकीत नमूद करण्यात आला.

“हर घर तिरंगा” अभियान साजरे करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडून एक सादरीकरणही प्राप्त झाले आहे. त्यानुसार डोंगर शेवली ग्रामपंचायत मध्ये दि. 13/08/2025 रोजी सरपंच सौ वैशाली शरद जवंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले दि. 14/08/2025 ला उपसरपंच सौ. मीरा सुनील गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.15/08/2025 ला सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. तसेच मराठी पूर्व माध्यमिक केंद्रीय शाळेत दि. 13.14.15 ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रवींद्र पाटील सावळे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. तसेच उर्दू शाळेत शे. कय्युम अध्यक्ष यांच्या हस्ते तिन्ही दिवस ध्वजारोहन करण्यात आले. त्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरशेवली येथे दि. 13/08/2025 रोजी सौ ज्योती कानफाडे आशा सेविका यांनी ध्वजारोहन केले. दि 14/08/2025 रोजी सौ शारदा दसरकर आशा सेविका यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

दि.15/08/2025 सौ जोत्स्ना सावळे गटप्रवर्तक यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. त्या ठिकाणी सी एच ओ अवचार मॅडम आरोग्य सेवक गाढवे सर आरोग्य सेविका बीबे मॅडम आरोग्य सेविका कंडारे मॅडम तसेच पशु वैद्यकीय दवाखाना येथे दि.13 रोजी शे. युसूफ शे.गणी कर्मचारी जिल्हा परिषद यांनी ध्वजारोहन केले. दि 14 ऑगस्ट रोजी गजानन दसरकर उपसंपादक दैनिक बातमी जगत यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दि 15 ऑगस्ट 2025 रोजी माजी सैनिक (मेजर) संजय ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.ध्वजारोहन संपल्यानंतर मराठी शाळेत विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. हे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर डोंगर शेवली ग्रामपंचायत मधे संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. गावामध्ये पालखी ची मिरवणूक ग्रामपंचायत अधिकारी श्री विजय शालिग्राम शेळके व सरपंच सौ वैशाली जवंजाळ यांच्या पुढाकारणे काढण्यात आली त्यावेळी बहुसंख्य गावकरी भजन मंडळ उपस्थित होते. सर्व कार्यक्रम ग्रामपंचायत ने चोख पणे पर पडल्यामुळे गावाकऱ्यांनी ग्रामपंचायत ची प्रसंशा केली.

You may have missed

error: Content is protected !!