मेरा बु जिल्हा परिषद सर्कल मधील समस्याला हाकेला साथ देणारा माणुस गजानन वायाळ.

IMG-20250817-WA0002

चिखली( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मेरा बु जिल्हा परिषद सर्कल हे रस्त्याच्या बाबतीत खूपच मागे राहिले आहे बुलढाणा माझा असाच काही इतर ठिकाणच्या बातम्या छापल्याअसता मेरा बु येथील पिंपळगाव सोनारा रोडवरील लोकांनी सांगितलं की आमच्या रोडकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.व मेरा बु जिल्हा परिषद सर्कल कडे सुद्धा आपल्या बातम्याचा ओक वाढवा त्यावेळी अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली व त्या ग्रुपमध्ये मेरा बु गावचे सरपंच प्रतिनिधी गजानन वायाळ हे सुद्धा होते त्यांनी ही माहिती

मिळताच त्यांनी मेरा बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलचा रस्त्याचा आढावा घेतला व विषय हा खूप मोठा गंभीर विषय आहे हे लक्षात घेऊन त्यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी एक दिवस लैखसनिक उपोषणाचा निर्णय घेतला आणि त्या निवेदनाला जिल्हा परिषद सर्कलच्या गावा गावातील जनतेने सुद्धा पाठिंबा दिला आणि 15 ऑगस्ट 2025 रोजी गजानन वायाळ व त्यांचे सहकारी यांनी उपोषण सुरू केले याची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलढाणा व सार्वजनिक बांधकाम विभाग देळगाव राजा यांच्या प्रतिनिधीने गजानन वायाळ व त्यांचे सहकारी मेरा बु येथे उपोषणाला बसले असता त्यांच्या उपोषणाला भेट देऊन आम्ही आजच्या आज कामाला सुरू करतो तुम्ही उपोषण मागे घ्या असे लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात ह्या गोष्टी एकाच वेळेस झाल्या मेरा बु येथील उपोषण सार्वजनिक बांधकाम उपविभाग देळगाव राजाचे उपकार्यकारी अभियंता वाघ साहेब यांनी मध्यस्थी करून मेरा बु येथील उपोषण मागे घेतले उपोषणाला वाढता पाठिंबा पाहता त्यांनी ताबडतोब कामाला सुरुवात केली आहे तर कवठळ येथील गावकऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले होते त्यावेळी गजानन वायाळ व सहकारी कवठळ येथे जाऊन जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता चेके यांनी त्यांचे काम लवकरात लवकर म्हणजेच उद्या किंवा परवा कामाला सुरुवात करू असे लेखी आश्वासन देऊन कवठळ गावाचे उपोषण सोडविले तर रोहडा येथील उपोषण गजानन वायाळ व कार्यकारी अभियंता वाघ साहेब यांच्या मध्यस्थीने सोडले त्यामध्ये त्यांनी सुद्धा लेखी आश्वासन देऊन गावा पासुन हावे पर्यंत चिखली जालना हवे रोड पर्यंत कामाला सुरुवात करू अशी लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे रोहडा येथील उपोषण सुद्धा 15 ऑगस्ट 2025या दिवशी सुटले आहे एकंदरीत गजानन वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सर्कलमधील लोकांनी त्यांना पाठिंबा दिला व त्यांनी सुद्धा लोकांच्या हाकेला होऊ देऊन आपले कार्य चालू ठेवले त्यामुळे मेरा बु जिल्हा परिषद सर्कल मधील रोडची जी खराब अवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून कामे सुरू झाले आहे त्यामुळे मेरा बु येथील जिल्हा परिषद सर्कल मधील लोकांनी गजानन वायाळ फोन द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून गजानन वायाळ यांचे आभार मानले आहे आणि आपले कार्य असेच चालू ठेवा असे शब्द सुद्धा दिले आहेत आपल्यासारख्या माणसाची गरज आपल्या मेरा बु जिल्हा परिषद सर्कल आहे असे सुद्धा काही लोकांनी गजानन वायाळ यांना बोलून दाखवले आहे गजानन वायाळ यांनी सुद्धा सांगितले की आपल्या शब्दाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आपण सांगाल ते कामे करायला मी तयार आहे

You may have missed

error: Content is protected !!