प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीवर वीज कोसळल्याने इमारतीचे नुकसान,सुदैवाने वाचले चिरमाडे कुटूंबाचे प्राण ….

IMG-20250817-WA0008

लोणार (यासीन शेख) तालुक्यातील दाभा येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 सुमारास सुसाट वाऱ्यासह विजेच्या गडगडाटसह जोरदार पावसाने दाभा ग्रामस्थांची दणादन उडवून दिली असतानाच दाभा येथे निसर्गाने आपले रुद्ररूप धारण करून आकाश पातळ एक करत एका पाठोपाठ आकाशात पाऊस विजेचा जोर वाढत होता अशातच दाभा गावातील ग्रामस्थांचे आरोग्य जपणारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत विजेचे शिकार ठरली दाभा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे इमारतीवर लावलेल्या ध्वज स्तंभावर वीज कोसळल्याने इमारतीचे नुकसान झाल्याची घटना दिनाक 15 ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. विजेचा वेग प्रचंड असल्याने इमारतीला तडे गेले आहे.

दैवबलवत्तर म्हणून वाचले चिरमाडे परिवाराचे प्राण याच प्राथमिक आरोग्य केंद्रातच्या निवासात राहत असलेले दाभा गावाला आरोग्य सेवा देणारे कर्तव्य दक्ष आरोग्य सेवक राजू चिरमाडे त्याची पत्नी रुपाली चिरमाडे, छोटा मुलगा रुद्राक्ष चिरमाडे सकुटूंब विजेच्या धमाक्यातून सुदैवाने बचावले. विजेच्या धमाक्याने चिरमाडे याच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही. घटनेची माहिती मिळताच दाभा गावातील सरपंच डॉ. मारोती मोरे, तलाठी दिगंबर गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी दैवशला बलशेठवाड, दाभा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ .जावेद शेख गावातील असंख्य ग्रामस्थानी भेट देऊन पाहणी केली.

” कपाट फुटले घरातील साहित्य नुकसान झाले.दैव बलवत्तर म्हणून वाचले आमचे प्राण विजेच्या धमाक्याने माझे कुटूंब भयभीत झाल्याने आम्हाला ग्रामस्थांनी दिली मायेची ऊब”‌‌- राजू चिरमाडे आरोग्यसेवक

You may have missed

error: Content is protected !!