गुरुकृपा कॅपिटल तर्फे सेवा रत्न पुरस्कार 2025 वितरण सोहळाप्रल्हाद थुट्टे गुरुकृपा कॅपिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर
छत्रपती संभाजीनगर( एकनाथ माळेकर)
गुरुकृपा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सेवा रत्न पुरस्कार 2025 या भव्यसमारंभाचे आयोजन दिनाक 16 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह निराला बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आयोजीत करण्यात आले दोनशे लोकांना सेवानिवृत्त पुरस्कार प्रदान करण्यात आला निवृत्त सेवकांच्या कार्याचा गौरव व सन्मान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला

आज समाजामध्ये निवृत्त लोकांच्या प्रति असलेली भावना बदलण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या अनुभवाचा आजच्या पिढीला कसा उपयोग होईल याचे साधर्म्य साधण्याचा प्रयत्न गुरुकृपा कॅपिटल करते असे मनोगत गुरुकृपा कॅपिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ प्रल्हाद थुट्टे यांनी व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर लेफ्टनंट करणार तथा आयपीएस अधिकारी डॉ. सतीश ढगे सर , लेफ्टनंट कर्नल संजय सोनवणे सर , रिटायर्ड एसीपी बालाजी सोनटक्के सर आणि अध्यक्ष पेन्शनर्स असोसिएशन श्री वसंत सबनीस सर हे होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करू शकतो असे मनोगत व्यक्त केले.
तसेच आज भारतामध्ये सर्वात जास्त युवा आहे आज भारताचे सरासरी वय काढले तर साधारणतः 29 वर्षे येते. त्यामुळे आज खरोखर भारताकडे होश आणि जोश ह्या दोन्ही गोष्टी आहे त्यामुळे आज या दोन्ही गोष्टीचा एकत्रित रित्या काम करून भारत हा नक्कीच महासत्ता बनेल असे मत डॉ. ढगे सरांनी व्यक्त केले.
तसेच मान्यवरांनी गुरुकृपा कॅपिटल सारख्या संस्थेची आज समाजामध्ये गरज आहे गुरुकृपा कॅपिटल फायनान्शिअल सर्विसेस मध्ये काम करते .आज आपण कोणत्याही कामाची सुरुवात करायची म्हटले तर पहिले आपण नियोजन करतो परंतु आपण फायनान्शिअल प्लॅनिंग करत नाही त्यामुळे आपल्याला गरजेच्या वेळी आपलाच पैसा असून वेळेवर मिळत नाही. त्यामुळे फायनान्शिअल प्लॅनिंग करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे असे मनोगत मान्यवरांनी केले.
सर्व फायनान्शिअल सर्विसेस विनामूल्य करण्याचे काम गुरुकृपा कॅपिटल करते गुरुकृपा कॅपिटल कडे अनुभवी टीम संपूर्ण डिजिटलायझेशन आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये गुरुकृपा कॅपिटल आपल्या सेवा पुरवते असे मनोगत गुरुकृपा कॅपिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर प्रल्हाद थुट्टे यांनी केले आपल्याला कोणत्याही सर्विसेस संबंधी गरज भासल्यास आपण मोफत सल्ला कंपनीच्या अनुभवी टीम कडून घेऊ शकता.
