विद्यार्थी सर्व गुण संपन्न झाला पाहिजे . प्रा .खडसे
सिंदखेडराजा (अनिल दराडे) २३ जून रोजी विदर्भातील शाळेचे सत्र सुरू झाले या वेळी शासन स्तरावरून पहिल्या दिवशी प्रवेशासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आले होते.दुसरबीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी प्रा .संजय खडसे यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी मोठ्या आनंदाच्या उत्साहात स्वागत करण्यात आले .
या वेळी विद्यार्थी व पालक वर्गांना संबोधताना प्रा खडसे यांनी विद्यार्थ्याला अभ्यासासोबत भाषण ,कला ,गायन वाचन सुंदर अक्षर जनरल नॉलेज.इत्यादी गोष्टी बालपणी यायला हव्यात त्या वेळेस ती सर्व गुण संपन्न होईल . या वेळी त्यांनी सर्वच विद्यार्थ्या सोबत हितगुज साधत त्यांच्या सोबत सेल्फी घेऊन आनंद उत्सव साजरा केला व विद्यार्थ्यांना पुष्प मिठाई ,पुस्तके ,देऊन स्वागत केले व तसेच या साठी गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे अशी भावनिक साद या कार्यक्रमात घातली .शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .
