सुतार समाजातील गुणवंताच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन
मेहकर : ( गणेश राऊत )दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समिती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याची आयोजन १३ जुलै ला श्री क्षेत्र येल्होजी महाराज संस्थान जांभोरा येथे करण्यात आलेले आहे . सुतार समाजातील विविध स्पर्धा परीक्षा , १० वी , १२ वी , पदवी , पदव्युत्तर पदवी उतीर्ण समाजातील गुणवंताच्या च्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण सोनुने (वैज्ञानिक कृषी विद्यापीठ जालना ) हे राहाणार आहे तर प्रमुख उपस्थिती आ . श्वेताताई महाले पाटील, माजी आ. डॉ संजय रायमुलकर, अशोक थोरहाते (उपाध्यक्ष विवेकानंद आश्रम ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे . या वेळी शासकीय योजना व सुतार समाजाची मानसिकता या विषयावर गजानन उगवेकर प्रशिक्षक राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे मार्गदर्शन करणार आहेत . कार्यक्रमाचे बहारदार संचलन भगवान राईतकर सर हे करणार आहे तरी सुतार समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका अरुण जाधव सर 9096919711 , राम सोनवणे सर 8888420629, जयप्रकाश सोळंके सर 9503676677,सुशील इंगळे 7720894685, श्रीधर आवेकर 9763276514 यांच्याकडे तसेच मेहकर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका गणेश राऊत 9922209738 या क्रमांकावर पाठवाव्या . या सत्कार सोहळ्यासाठी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अनंत राऊत जिल्हाअध्यक्ष व बुलढाणा जिल्हा सुतार समाज एकीकरण समिती यांनी केले आहे
