कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाची शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची 29 वी सभा संपन्न….
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मुरादपूर येथे २५ जून,२०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा द्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा मौजे मुरादपूर, ता. चिखली येथे श्री. रामेश्वर इंगळे यांच्या शेतात आयोजित करण्यात आली होती.या सभेला अध्यक्ष म्हणून श्री. विष्णूभाऊ गाडेकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा,डॉ. दिनेश कानवडे, प्रमुख-कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, विषय विशेषज्ञ- पशुसंवर्धन, डॉ.जगदीश वाडकर, विषय विशेषज्ञ- विस्तार शिक्षण तसेच
श्री विजय भुतेकर, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व श्री. स्वप्निल महाजन, अध्यक्ष-
तसेच पत्रकार एकनाथ माळेकर
शेतकरी शास्त्रज्ञ मंच,
कृषी संशोधन केंद्र बुलढाणा आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी, डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी विद्यापीठ निर्मित कृषी निविष्ठांची खरीप पिकातील उपयुक्तता याबद्दल माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, शेतकरी -शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविणे अगत्याचे आहे व त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा सज्ज आहे.
त्यानंतर डॉ.दिनेश कानवडे, प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा यांनी खरीप पीक लागवड तंत्रज्ञानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच मका पिकाच्या व्यवस्थापनाविषयी सखोल माहिती दिली.
श्री. स्वप्नील महाजन, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा यांनी शुन्य मशागत तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना उद्बोधित केले. यानंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये खरीपातील कीड-रोग नियंत्रण व व्यवस्थापन यावर साधक बाधक चर्चा झाली. त्यानंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांनी श्री. रामेश्वर इंगळे यांच्या टोमॅटो लागवड केलेल्या प्रक्षेत्रास भेट दिली व टोमॅटो लागवडीविषयी रामेश्वर इंगळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.जगदीश वाडकर, विषय विशेषज्ञ-विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले. सदर कार्यक्रमास शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य मोहन जगताप, सतिष काका वारे, प्रकाश सपकाळ, सर्जेराव पाटील, आंनद लहाने, टेकाळे काका व मुरादपुर येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रामेश्वर इंगळे, श्री. भारत परिहार, श्री. उमेश गाडेकर आदिंनी परिश्रम घेतले.
