कोनड खुर्द च्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव आनंदात साजरा
सिंदखेडराजा अनिल दराडे विद्यार्थ्याचे जीवन घडवण्याची जननी असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस यावे या हेतूने जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रवेशोत्सव दिनाचे मोठ्या आनंदाने व थाटामाटात स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे कोणड खुर्द तालुका चिखली येथील मराठी प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे शिक्षक श्री चिंचोले सर् व भाकडे सर यांनी यांच्या परीने व खूप प्रयत्न केले मनापासून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची उत्स्फूर्त तयारी केली यावेळी शाळा कर्मचारी तसेच गावचे सचिव श्री डी आर डुकरे पाटील यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावी व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत आल्याने शिक्षक तसेच विद्यार्थी या दोघांची सुसंगती होती व विद्यार्थ्यांची प्रगती होते त्या दृष्टी ने उद्या भविष्याचा आदर्श विद्यार्थी व आदर्श जीवन जगण्याची कला या शाळेतूनच मिळते असे प्रतिपादन यावेळेस बोलताना सिद्धार्थ पैठने यांनी केले यावेळी ग्रामपंचायतीचे सचिव डीआर डुकरे सरपंच संजय वानखेडे सदस्य शंकर जावळे सुखदेव जावळे प्रवीण जावळे सुरज वानखेडे यासह शिपाई संदीप वानखेडे ऑपरेटर नितीन जावळे सह ग्रामपंचायत सदस्य जया वानखेडे हे उपस्थित होते प्रथम विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित उपस्थितीबाबत व शालेय साहित्याच्या वाटपाबाबत आयोजकाकडून व ग्रामपंचायतकडून शिक्षकांचे आभार मानण्यात आले व शाळेसाठी आपण मागितलेली किंवा आपण मागणी केलेली वस्तू आम्ही नक्कीच वेळेवर देण्याचा प्रयत्न करू यावेळेस शिक्षकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीकडून त्यांना पाण्याची टाकी देण्यात आली तसेच नळाची व्यवस्था सुद्धा दोन दिवसात करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही जसे झटून प्रयत्न करतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून मदत करून आपली विद्यार्थी संख्या वाढून शिक्षणाची सोय चांगली व्हावी व तत्परतेने विद्यार्थ्यांनी ही शाळेत यावे अशी यावे गावकऱ्यातून एक आनंदाचा सुर उमटत आहे
