मेरा खुर्द ते मेरा बु जिल्हा प्रमुख मार्ग 31 वर ठेकेदार यांच्या आडमुठेपणामुळे जिवंत हाणी होता होती ठळली ….

Screenshot_2025-08-17-21-25-50-71_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु ते मेरा खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग 31 वर रोडचे काम 15 ऑगस्ट 2025 रोजी गावागावातील लोकांनी गजानन वायाळ यांचा मार्गदर्शन खाली उपोषण केले होते सार्वजनिक बांधकाम उपविभाग देळगाव राजा यांनी कामालाही सुरवात केली आहे मेरा खुर्द मेरा बु रोडच्या कामाला सुरुवात झाली खरी परंतु सदर काम हे ठेकेदार यांच्या नियोजन शून्य कारभार करत आहे सदर ठिकाणी जी गिटी टाकण्यात आली आहे ती अर्ध्या रोड पेक्षाही जास्त रोड टाकण्यात आली आहे सदर गिट्टी ही सुलपावर टाकण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती परंतु ठेकेदाराच्या अडमटपणामुळे त्यांनी ती रोडवरच टाकली आहे शासकीय ठेकेदार गजानन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की काम हे लवकरात लवकर करणे आणि लोक हे ऐकत नाही त्यामुळे गिट्टी टाकण्यात आली आहे जर लोक थांबले असते तर रोडचं साईडला गिट्टी टाकली असती परंतु सदर हे कारण योग्य नाही कारण गिट्टीही रोडच्या साईडला टाकायला पाहिजे होती परंतु ठेकेदाराच्या अडमोटपणामुळे सदर गिट्टी ही रोड वरच टाकण्यात आली आहे रोडच्या मधोमध पेक्षाही जास्त रोड हा गिट्टीने व्यापला आहे सदया पावसाळ्याचे दिवस आहे रात्री अपरात्री रोडवर वाहतूक सुरू आसते त्यामुळे जीवित हानी होण्यास वेळ लागणार नाही तसेच मेरा खुर्द वरुन अंत्री खेडेकर येणाऱ्या माल वाहक ट्रक गिट्टी रोडवर असल्यामुळे ट्रक रोडच्या खाली गेला आहे सदर ट्रक पलटी होता होता वाचला आहे ट्रक वाहक
यांना आर्थिक भुर्दंड पडला आहे सदर माहिती ठेकेदार यांना मिळतात त्यांनी तेथील
गिटाचा गंज हरवलेला आहे परंतु रोडवरील गिटी चे अनेक पुरावे बुलढाणा माझाच्या हाती आले आहेत आसे अनेक ठिकाणी मेरा बुद्रुक कडे जाणाऱ्या रोडवर शासकीय ठेकेदार गजानन घुगे यांनी रोडवरच गिट्टी टाकली आहे त्यामुळे जीवित हानी होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही

You may have missed

error: Content is protected !!