स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भूमी अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा च्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता पत्रकाचे वाटप

IMG-20250817-WA0044

सिंदखेडराजा( अनिल दराडे)भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मा. पालकमंत्री यांच्या हस्ते नागरिकांना मालमत्ता पत्रक वाटप करण्यात येत आहे. स्वामित्व योजना मालमत्ता पत्रक वितरण हा उपक्रम महसूल व भूमी अभिलेख विभाग ,ग्राम विकास विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून पार पडला.

15 ऑगस्ट च्या निमित्ताने मा. पालकमंत्री बुलढाणा श्री. मकरंद पाटील साहेब यांच्या हस्ते तसेच मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बुलढाणा श्री नरेंद्र झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात मालमत्ता पत्रकाचे वाटप करण्यात आले.स्वामीत्व योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र मध्ये महास्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना सनद वाटप करण्यात येत आहे. काल भूमी अभिलेख कार्यालय सिंदखेड राजा येथे नागरिकांना सनद वाटप करण्यात आल्या आहेत.

या मालमत्ता पत्रकाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची साथ व जमिनीचा अधिकार आपल्या हातात येणार आहे. हे मालमत्ता पत्रक आपल्या घराच्या जागेचे महत्वाचे कागदपत्र असणार आहे.

हे मालमत्ता पत्रक म्हणजे सेवा एक फायदे अनेक असे आहे,

1) अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावठानातील मिळकतीचे अचूक मोजमाप ,नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे आता झाले सोपे व जलद

2) सीमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील

3) मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी

4) कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा

5) जमिनीशी संबंधित मतभेदांचे त्वरित निराकरण
मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ

6) गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना

या मालमत्ता पत्रकातून वरील सर्व फायदे नागरिकांना मिळणार आहेत.

भूमी अभिलेख सिंदखेड राजा कार्यालयाचे दोन पथके हे सावखेड तेजन आणि विझोरा या गावामध्ये गेले होते आणि त्यांनी तिथे मार्गदर्शन शिबीर घेऊन तेथील नागरिकांना सनद प्रमाणपत्राचे महत्व सांगून त्याचे वाटप केले आहेत.या दोन्ही पथकाच्या माध्यमातून एकूण 63,650/- ₹ एवढी विक्रमी सनद फीस ची वसुली करण्यात आली.

सावखेड तेजन येथील पथकामध्ये मुख्यालय सहायक मारोती थोरवे, परिरक्षण भुमापक गोपाल वाघमारे, भुमापक प्रकाश शिंदे हे होते तर विझोरा येथील पथकामध्ये निमतनदार राजाराम चोखट, भुमापक आयुष नायगावकर, अनिल बरबडे उपस्थित होते.

सिंदखेड राजा येथील कार्यालयामध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे येथील कार्यालयातून सर्वात कमी म्हणजेच फक्त दोन पथक तयार करण्यात आली होती परंतु येथील पथकातील कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन जिल्हात सर्वाधिक सनद फीस वसुली केली आहे, मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बुलढाणा नरेंद्र झांबरे साहेब यांनी या कामाचे कौतुक केले.

You may have missed

error: Content is protected !!