भारत सरकारच्या राज्यमंत्रीच्या जिल्ह्यात गुटख्याची खुलेआम विक्री अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याने डोके वर काढले अनेक दिवसापासून बंद असलेला गुटखा सुरू झाला कसा जनतेचा सवाल
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील काही गावे देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत आहे अनेक दिवसापासून गुटखा बंद होता परंतु काही दिवसापासून गुटख्याने चांगलंच डोकं वर काढले आहे त्यामध्ये शाळकरी मुलांचे आठवी दहावीच्या पोरांच्या खिशात गुटख्याच्या पुढ्या शाळकरी मुलाच्या तोंडात तंबाखू चा वास येत आहे
तंबाखू आणि गुटक्याची होणारी दुष्परिणाम पाहता तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला गुटखा विक्रीतून मिळणारा महसूल बुडाला तरी चालेल पण नागरिकांचे आरोग्य शाबूत राहिले पाहिजे या भावनेने तेव्हा राज्य सरकारने हा निर्णय घेतला तो आजही कायम आहे मात्र हा निर्णय फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळात बंदी असलेल्या घटका व तंबाखू खुल्या विक्री होत असल्याची दिसून येत आहे गुटखा विक्रेते सदर दुकानदार यांना सांगत आहे की आम्हाला समोर हप्ता द्यावा लागतो त्यामुळे आम्हाला वाढीव किमतीमध्ये विकावा लागत आहे तर हे हप्ता घेणारे अधिकारी कोण आहेत यांचा सुद्धा माहिती जाहीर व्हावी गुटखा बंदी असली म्हणून त्याची जादा भावात विक्री होते गुटखा गुजरात मध्ये वलसाड येथे उत्पादन होत असल्याची पुडीवरून निदर्शनास येते शहरात प्रत्येक लहान मोठ्या पान टपऱ्यावर खुल्या विक्री होत असल्याचे दिसून येत आहे त्याला अटकाव कुठेच नाही जणू काही गुटखा हा कायदेशीरच आहे
गुटखा बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यावर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएची आहे मात्र मनुष्यबळाचे कारण सांगून या विभागाकडून कुठलीच कारवाई होत नाही पोलिसांकडून तर सोयीनुसार कारवाई होते या दोन्ही यंत्रणेच्या सहकार्य शिवाय गुटखा तस्कर इतकी मोठी हिम्मत करू शकत नाही जर औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन विभाग यांनी जर गुटख्यावर बंदी केली नाही तर यांच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन छेडण्यासाठी वेळ लागणार नाही तुर्तास एवढेच
