शेळगाव आटोळ येथील तरुणाचा पाण्यात वाहून मृत्यू…

Screenshot_2025-08-17-17-00-27-17_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ येथील चेतन वंसता बोर्डे वय 22 वर्ष हे आपल्या बकऱ्यांना चारण्यासाठी 17 ऑगस्ट 2025 रोजी चारा आणण्यासाठी बारा ते एक वाजेच्या दरम्यान जंगलात गेले असता नदीला पूर आला नदीला पूर आलेला होता नदीच्या पुरात पाय घसरून पाण्यात पडले पाण्याचा प्रवाह बरोबर अंदाजे एक किलोमीटर पर्यंत वाहून गेले व सुभाष सखाराम मिसाळ यांच्या शेताजवळ असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला सदर माहिती चिखली चे तहसीलदार संतोष काकडे यांना मिळतात त्यांनी महसूल अधिकारी यांना पाठवून त्यांचा पंचा समक्ष पंचनामा केला आहे आणि चिखली तालुक्यातील जनतेला आव्हान केले आहे की सध्या सतत धार पाऊस सुरू आहे त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच राहावे अर्जंट काम असले तरच घराबाहेर पडा आणि बाहेर रस्त्याने जाताना सुद्धा पाण्याचा ठावठिकाणा घ्या नंतरच पाण्यातून समोर जाण्याचा निर्णय घ्यावा असे आव्हान चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

You may have missed

error: Content is protected !!