शेलगाव राऊत परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल…
सिंदखेड राजा : (अनिल दराडे) तालुक्यातील शेलगाव राऊत गाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांच्या शेतामध्ये तसेच घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकरी संकटात सापडले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी श्रीमंत राऊत पाटील यांनी केली आहे.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
