चिंचोली जहागीर येथे ढगफुटी; तीन कुटुंबांच्या घराचे नुकसान…

Screenshot_2025-08-18-12-56-45-62_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
गावातील झालेल्या ढगफुटीमुळे मोठे संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये देविदास बोडके, बद्रीनाथ काकड व प्रकाश काकड या तिघा कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे बाधित कुटुंबे उघड्यावर पडली असून तातडीने मदतीची गरज भासत आहे. याबाबत गावचे सरपंच भगवान पालवे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून पीडितांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अनिल दराडे चिंचोली गावात झालेल्या ढगफुटीमुळे मोठे संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये देविदास बोडके, बद्रीनाथ काकड व प्रकाश काकड या तिघा कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे बाधित कुटुंबे उघड्यावर पडली असून तातडीने मदतीची गरज भासत आहे. याबाबत गावचे सरपंच भगवान पालवे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून पीडितांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष भगवान पालवे व गावकरी यांनी केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!