जांभोरा येथील पाझर तलावाने नुकसान झालेल्या भागाची महसूल अधिकारी यांच्याकडून पाहणी,नदी नाल्या ला पूर असताना त्यामधून रस्ता ओलांडून जाऊ नका, प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी

IMG-20250818-WA0051


सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेड राजा तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे हे ओसंडून भरून वाहत आहे त्या मुळे गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे अवाहन सिंदखेड राजा चे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.
सिंदखेड राजा तालुक्यामधील जांभोरा येथे पाझर तलाव फुटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे तिथे गेले होते. पाझर तलाव फुटल्यामुळे झालेल्या आजूबाजूच्या शेतीची नुकसानीची पाहणी त्यांनी केली. व गावातील नागरिकांशी त्यांनी झालेल्या नुकसानी बाबत संवाद साधला व पाझर तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. अजूनही पावसाची संततधार चालू असल्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी पावसाचा अंदाज घ्यावा, विनाकारण घराबाहेर पडू नका, अगदी गरज असेल तरच, पूरस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षिततेला प्राधान्य द्या,ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणी वरून जाण्याचा प्रयत्न करू नका, नदी नाल्याला पूर असताना रस्ता ओलांडू नये, असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!