जिल्हा परिषद पिंपळगाव सोनारा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचे तिनतेरा, गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

Screenshot_2025-08-19-14-48-43-82_680d03679600f7af0b4c700c6b270fe7

सिंदखेडराजा( एकनाथ माळेकर) तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील मनीषा साहेबराव साखरे शाळा समिती अध्यक्ष यांनी लेखी स्वरुपात गटशिक्षण अधिकारी सिंदखेडराजा येथे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत असं म्हटलं आहे की,
जि.प.उ.प्रा.शाळा पिंपळगांव सोनारा शाळेमधील संडास, मुतारी, आवारातील गांजर गवत २ फुट वाढलेले असून यांच्या पासून त्रास होत आहे.

तसेच शाळेमध्ये पोषण आहार कधी मुलांना मिळतो तर कधी मिळत नाही मिळाला तर तो कच्चाच असतो व त्यामध्ये भाजीपाल्याचा वापर केल्या जात नाही अशा प्रकारे निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार मुलांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.
तसेच शाळेमध्ये मुलांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था सुध्दा नाही. तसेच शाळा ही वेळेवर भरत नाही, शाळा वेळेवर भरली नाही तर राष्ट्रगीत सुध्दा शाळेमध्ये घेतले जात नाही. या बाबत शिक्षण समितीचे अध्यक्ष यांनी विचारपुस करण्याकरीता गेले असता उडवा डउवीचे उत्तरे देतात व शिक्षण समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचे जाईट खाते सुध्दा मागील १ वर्षापासून काढलेले नाही. शालेय पोषणाचे मिळणारे पैसे हे कोठे जातात याची काहीही कल्पना नाही व तसेच वरचे वर दुसरा कोणी शाळा समितीचा अध्यक्ष केला की काय या बाबत काही ही कल्पना नाही. त्यामुळे शाळेत मिळणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्या यासाठी तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे.

You may have missed

error: Content is protected !!