शेळगाव आटोळ ग्रामपंचायत हायकोर्टात गेली पण साधा स्मशानभूमीसाठी रस्ता नाही ग्रामपंचायतची शोकांतिका स्मशान भूमी कडे रस्ता करा अन्यथा ग्रामपंचायत उघडू देणार नाही युवकांचा निर्धार.

IMG-20250819-WA0000

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ येथील ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षापासून कोटी रुपयाचा निधी असूनही अनेक विकास कामे कोळंबिले आहेत. मेरा खुर्द जिल्हा परिषद मध्ये सर्वात मोठी मानल्या जाणारी ग्रामपंचायत ही शेळगाव आटोळ‌‌‌येथील असून या ठिकाणी बरेच विकास कामे थांबलेली आहे यामध्ये ग्रामपंचायत मधील सदस्य व त्यांच्यामधील असणारा वाद हा हायकोर्ट पर्यंत जाऊनही रास्त विषय मार्गी लागत नाही.

गावाच्या विकासासाठी हाच एक मुख्य अडथळा आहे असे गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु आता गावातील युवकांनी गावातील समस्यांचा भडीमार या ठिकाणी ग्रामपंचायत वरती लावलेला दिसून येतो आहे आता गावातील युवकांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला असून याचाच एक भाग म्हणून गावातील करण यंगड, शक्ती शिंदे, अशोक खर्डे, संघर्ष बोर्डे, संकेत बोर्डे, शुभम हिवाळे, विट्टल मिसाळ, पवन अंभोरे, मयूर वाघमारे,आदित्य इंगळे, सुरज निकाळजे, संदेश घेवंदे तेजस झऱ्हाडे, शुभम गावडे यांच्यासह इतर युवकांनी वैदुवाडी येथे असलेली स्मशानभूमी मी कडे जाणारा रस्ता हा ग्रामपंचायत कडून तयार करून घेण्याचा निर्धार केला आहे. याचे कारण असे कि ग्रामपंचायत शेळगाव आटोळ अंतर्गत वैदवाडी येथे असलेली स्मशानभूमी चांगल्या प्रकारे तयार आहे पण तिथे जाण्यासाठी रस्ता नाही तिथे कुठल्याच प्रकारची सुविधा नाही गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. कालच गावातील एक तरुण नदीच्या पात्रात बुडून मृत्यू पावला व त्याच्या अंत्यविधीसाठी लाखो नातेवाईक गावकरी या ठिकाणी जमले होते परंतु त्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी गावकऱ्यांसह अनेक नातेवाईकांना खूप कसरत त्या ठिकाणी करावी लागली. काही नातेवाईकांना तर खूप अंतर उभे राहावे लागले हीच बाब या युवकांच्या लक्षात आली व त्यांनी त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता ग्रामपंचायतच्या मार्फत करून घेण्याचा निर्धार या ठिकाणी केला आहे. या युवकांची ही मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 2 सप्टेंबर 2025 रोजी युवकांनी ग्रामपंचायतला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. व जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतली आहे. या आंदोलनाची दखल ग्रामपंचायतने न घेतलस या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दिसून येत आहे तरी ग्रामपंचायत या ठिकाणी काय भूमिका घेते याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

You may have missed

error: Content is protected !!