साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्याततात्काळ विल्हेवाट लावण्याची गरज – शेख वसीम..
लोणार (यासीन शेख) सुलतानपूर ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास मोठा धोका सध्या सुरु असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत असून सुलतानपूर ग्रामपंचायत ने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना दुर्लक्ष करत आहे. सुलतानपूर ता. लोणार येथील वार्ड क्र.२ मधील जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरामध्ये सांडपाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .या सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याची गरज आहे. तर शाळा परिसरामध्ये घाणीमुळे व सांडपाण्यामुळे डुकराचे प्रमाण वाढले आहे या मोकाट डुकराचा सुद्धा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शाळेमध्ये येजा करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेमध्ये ये जा करावी लागते. विद्यार्थ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठी तात्काळ सिमेंट रोड व रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम करण्यात यावे.अन्यथा विद्यार्थी पालकासह लोकशाही मार्गाने सुलतानपूर ग्रामपंचायत समोर दि २५ ऑगस्ट २०२५ पासून “प्राणांतीक आमरण उपोषण” करण्यात येईल असा इशारा देत शेख वासिम पत्रकार यांनी गटविकास अधिकारी लोणार यांना निवेदन दिला.
