बुलढाणा जिल्ह्यात ओला दृष्काळ जाहीर करण्यासह शेतीपीकाची भारीव नुकसान भरपाई द्या- विनायक सरनाईक
तहसिलदार,तालुका कृषी अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली नुकसानीची पाहणी…….
चिखली (निलेश कोल्ह)बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस दोन दिवसांपासून कोसळत आहे.नदया ,नाले,ओढे दुधडी भरुण वाहत आहेत. शेतकऱ्यांचे शेतीपीक संपूर्ण पाण्यात गेले आहे.घरांची पडझड झाली असून अन्नधान्याचे शहर व ग्रामीण भागात नुकसान झाले असल्याने या नुकसानीची पाहणी दि१९ऑगस्ट २०२५रोजी तहसिलदार श्री संतोष काकडे,तालुका कृषी अधिकारी श्री सुरडकर यांच्यासमवेत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केली.जमीनी चिबडून शेतीपीकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे हातचे पिक गेले असल्याने बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा,पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी परीस्थिती काही वर्षापुर्वी ओढावली होती तेव्हा पश्चिम महाराष्ट्र जसी भारीव अशी नुकसान भरपाई दिली होती त्यानुसार भारीव अशी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील विनायक सरनाईक यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अशा या भिषण परीस्थितीत सर्वानी एकजूट दाखवून एकमेकास व संकटात असणाऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवहाण सरनाईक यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात व चिखली तालुक्यात शनिवारी व दि 17,18ऑगस्ट 2025रोजी
पावसाने धुमाकूळ घातला.चिखली तालुक्यात सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे दोन दिवसात जिल्ह्यातील तब्बल बारा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.आजची परीस्थिती या पेक्षा ही भयावह असून चिखली तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये दोन दिवस सततधार मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतीपीक संपूर्ण पाण्यात बुडाले आहे.हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून सोयाबीन पिक व इतर पिके उध्द्वस्त झाली आहे.जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.या अस्मानी संकटामुळे खरीप हंगामातील सोयाबीन ,मक्का,उडीद,मुंग यासह इतर पिकांचे सर्वत्र तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नदिकाठच्या व अतिवृष्टीच्या शेतीपिकाची पाहणी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्यासमवेत सोमठाणा,दिवठाणा,उत्रदा,पेठ, बोरगांव वसु,बोरगाव काकडे या परीसरात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात विनायक सरनाईक, नितिन राजपुत,भारत वाघमारे,यांनी पाहणी केली संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात ओला दृष्काळ घोषीत करण्यात यावा, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र मध्ये झालेल्या पुर परीस्थीती सम जिल्ह्याची परीस्थीती झाली असल्याने विशेष भारीव अशी नुकसान भरपाई मदत जाहिर करुण शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा,शहरातील व ग्रामीण भागात झालेल्या घर नूकसानीची व खचलेल्या विहिरींचे पंचनामे होवून त्याची सुद्धा भारीव मदत देण्यात यावी अशी मागणी विनायक सरनाईक यांनी मुख्यमंत्री,कृषीमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी शेती चिभडली सरसगट नुकसान भरपाई द्या…
चिखली तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडला सर्व नदयांना पुर परीस्थीती निर्माण झाल्याने सर्वत्र शेतीपिके पाण्यात गेली आहे.कधी ही भरुण न निघणारी हाणी शेतकऱ्यांची झाली आहे.तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसत असल्याने ओला नदिकाठच्या शेतीपिक नुकसानीची व तालुक्यात सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्यावी,जिल्ह्यात ओला दृष्काळ जाहीर करण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी केली आहे.यावेळी नितिन राजपुत,भारत वाघमारे,विलास वसू, भगवान मोरे,सरदारसिंग इंगळे, निवृत्ती इंगळे, संतोष शेळके, संतोष इंगळे,भारत खंडागळे, गजानन कुटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
