अंढेरा महसुल अधिकारी पाहतात तालुक्यातून अंढेरा महसूल चा कारभार,अंढेरा महसूल अधिकारी शेटे यांना मुख्यालयाचे वावडे बेजबाबदार महसूल अधिकाऱ्यावर अळा घाला अन्यथा उपोषण, शंकरराव सानप शेतकरी अंढेरा

Screenshot_2025-08-22-07-23-43-98_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

देऊळगाव राजा (एकनाथ माळेकर)सातबारा उतारा साठी आठवडा भर झुलवत ठेवल्याने तसेच सद्य स्थितीत सर्वत्र पूर परिस्थिती असतांना अंढेरा भाग १चे ग्राम महसूल अधिकारी तेजस शेटे हे मुख्यालयी न राहता ३४ किमी वर तालुका मुख्यालयी राहत असून यांच्या त्रासाला कंटाळून आठ दिवस फरफट झाल्याने अंढेरा येथील शंकरराव सानप यांनी १८ऑगस्ट रोजी रीतसर चौकशी करून सर्व पुरावे आहेत ते तक्रारीत नमूद करण्यात आले आहे व सादर करण्याची तयारी सुद्दा असून त्यात तथ्य आढळल्यास कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या कडे १८ऑगस्ट रोजी केली आहे.

याबात सविस्तर असे की दिलेल्या निवेदनात शंकरराव सानप यांनी म्हटले आहे की देऊळगाव राजा तालुक्यातील नंबर तिन चे गाव असून अंढेरा भाग १ चे ग्राम महसूल अधिकारी तेजस शेटे सातबारा उतारा साठी ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत झुलवत ठेवल्याचा दिनक्रम तक्रारीत नमूद करण्यात आला असून त्याचे सर्व पुरावे त्यांच्याकडे असल्याचे नमूद केले आहे तसेच अंढेरा गावाला दोन नद्यांचा वेढा आहे महसूल व आपत्ती व्यवस्थापन सद्या अलर्ट मोडवर असतांना हे ग्राम महसूल अधिकारी मुख्यालयी न राहता तालुका मुख्यालयी राहतात तसेच शेतकरी वर्गांना सातबारा उतारा देण्यासाठी झुलवत ठेवतात.तसेच मोबाईल वेळोवेळी बंद ठेवतात तसेच तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे सहाय्यक म्हणून काम करतात परंतु त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला? अंढेरा येथील दोन नद्यांच्या उगमावरील धरणे शंभर टक्के भरून वाहत आहेत.तसेच लाभार्थी यांना मुजोर पणे बोलतात. यांना वरद हस्त कुणाचा अंढेरा गावाला पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे येथे पन्नास खेड्याच्या संपर्क असतो नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास यांना कुठे शोधावे?तसेच माझे लॅपटॉप महसूल सहायक यांच्याकडे आहे हे वागणे बेजबाबदार पनाचे आहे.असे हे महसूल अधिकारी यांचे बेजबाबदार वागणे चुकीचे असून त्यांची सखोल चौकशी करून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांना खीळ बसत असून मला दस्त मिळत नसल्याची बाब मी अंढेरा मंडळाचे मंडळ अधिकारी प्रल्हाद केदार यांना सुद्दा भ्रमणध्वनी द्वारे सांगून सुद्दा महसूल अधिकारी शेटे यांनी मला सातबारा उतारे देण्यास टाळाटाळ केली व आठवडा भर झुलवत ठेऊन मानसिक त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले असून त्याचे सर्व पुरावे फोन कॉल व संदेश त्यांच्याकडे असल्याचे सुद्दा त्यांनी तक्रारीत शंकरराव सानप यांनी नमूद केले असून तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आता काय कार्यवाही करतात याकडे परिसराचे लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे!

You may have missed

error: Content is protected !!