उप अधीक्षक भूमी अभिलेख पदाचा पदभार आता शिरस्तेदार मारोती थोरवे यांच्याकडे
सिंदखेडराजा (अनिल दराडे) भूमि अभिलेख विभाग हा महसूल विभागाचा एक महत्त्वाचा घटक असून जमीन विषयक सर्व गोष्टींची घडामोड या विभागामार्फत होत असते. शेतकऱ्यांच्या जमीनीच्या हद्दकायम, पोटहिस्सा, गुंठेवारी, बिगरशेती, कोर्ट कमिशन मोजणी, भुसंपादन मोजणी इत्यादी प्रकारची मोजणी कामे करत असते.
जमीन विषयक बाबी असल्यामुळे हा विभाग नेहमीच चर्चेत असतो. कार्यालयामध्ये शेताचा नकाशा, टिपण उतारा, सर्वे नंबर, नकला इत्यादी कामासाठी नागरिक येत असतात. भूमी अभिलेख सिंदखेड राजा कार्यालयाचे सर्व कर्मचारी लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात आणि लोकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी प्रयत्नशील राहत असतात.
“आपला सिंदखेड राजा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे तसेच आपल्या तालुक्यामध्ये साखरखेर्डा, शेंदुर्जन, देऊळगाव कोळ, मलकापूर पांग्रा एवढ्या दुरून नागरिक आपल्या कामासाठी येत असतात अश्या सर्व नागरिकांचे प्राधान्याने कामे व्हावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल तसेच सर्व मोजणी प्रकारणांना गती देऊन लवकरच निकाली काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल.”
मारोती थोरवे
उप अधीक्षक भूमी अभिलेख सिंदखेड राजा
