अमरावतीत डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा व क्रांतीगीत गायन

IMG-20250822-WA0018

अमरावती (बुलढाणा माझा न्युज)महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा, अमरावती यांच्या वतीने दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा व अंधश्रद्धा निर्मूलन व क्रांती गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी पार पडला.

सभेला मा. प्रा. डॉ. सतीश तराळ (उपाध्यक्ष, महा. अनिस अमरावती), मा. डॉ. राजकुमार दासरवाड (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय अमरावती), प्रा. भारत कल्याणकर, प्रा. डॉ. मंदा नांदुरकर (कार्यवाह, विवेक वाहिनी अमरावती), मा. गायत्री आडे (राज्यकार्यवाह, महिला विभाग), मा. प्रमोद कोळमकर, मा. महेश देशमुख, मा. श्रीकृष्ण धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. दाभोळकर यांना अभिवादन करून “विवेकाचा आवाज बुलंद करूया… फुले–शाहू–आंबेडकर… आम्ही सारे दाभोळकर” या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले. त्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले.

या प्रसंगी महा. अनिस अमरावतीच्या सांस्कृतिक विभाग व युवा विभागाने क्रांतीगीते व अंधश्रद्धा निर्मूलनपर गीते सादर केली.

कार्यक्रमाच्या आयोजनात मा. लक्ष्मण तडस, विजया करोले, सुनीता रामटेके, रंजना डोंगरे, निखिल धिकार, वेदांत कोल्हे, दिलीप लाडे, गौरव राऊत, सतीश पठाडे, दिगंबर मेश्राम, अनिता टांक, मंगल गवई, आशिष देशमुख, आर. एम. चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे यशस्वी संचालन जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल कुकडे (महा. अनिस अमरावती), आभार विजय डवरे (कार्यवाह सांस्कृतिक विभाग )यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!