किनगाव जट्टू येथे घरगुती पद्धतीने पोळा साजरा…

IMG-20250822-WA0027

सिंदखेडराजा (अनिल दराडे )लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे, अत्यंत साध्या घरगुती पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला. सध्या परिस्थितीमध्ये लंपी आजाराचे सावट असल्यामुळे, जनावरांना हा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाचे पालन करून, आणि कुटुंबांनी घरगुती पद्धतीने पोळा सण साजरा केला, यामध्ये किनगाव ते टू येथील ग्रामविकास अधिकारी, विनोद शामराव सातपुते यांनी आपल्या पत्नीसह घरीच बैलांची पूजा करून, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. यावेळी त्यांच्यासोबत, कल्पना सातपुते, ऋषिकेश सातपुते, प्रवीण सातपुते, निलेश सातपुते, विशाल साळवे, उपस्थित होते,

You may have missed

error: Content is protected !!