येणारे सण उत्सव कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करा !उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम .
सिंदखेडराजा (अनिल दराडे )किनगावराजा पोलिस येथे शांतता कमिटीची बैठक दिनांक 22 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम ,सिंदखेडराजा तहसीलदार अजय दिवटे व किनगावराजा पोलिस स्टेशन चे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली या वेळी त्या बोलत होत्या येणारे सण ,उत्सव सर्वांनी कायद्याचे काटेकोरपणे पालन करून चौकटीत राहूनच साजरे करा
,ईद ,गणपती , नवरात्र , ,दसरा , दिवाळी हे सण सर्वांनी शांततेत आणि मिळून मिसळून कोणतेही वाद विवाद ,न करता , आक्षेपार्य गाणे न वाजवता ,सोशल मिडियावर जाती जातीत कोणतेही वाद निर्माण होणार नाही अशा पोस्ट व्हायरल करता कामा नये ,याची काळजी घ्या .आमच्या कडे मनुष्य बळ कमी असल्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी मनिषा कदम मॅडम यांनी या वेळी उपस्थितांना केली .
……बॉक्स ….

मला पदभार घेऊन वर्ष पूर्ण होत असून आपल्या मातृतीर्थाचा ( तालुक्याचा )मला अंदाज आला आहे ,त्या मुळे इथे कोणतेच वाद होत नाही आणि पुढेही होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे .कुठे काही अनुसूचित प्रकार घडत असेल तर तात्काळ महसूल विभाग किंवा पोलिस स्टेशनची संपर्क साधा .आणि आपले ,गावाचे , तालुक्याचे नाव खराव होणार नाही ही आपणास काळजी घ्यायची आहे आणि येणारे सण ,उत्सव ,कोणतेही गाल,बोट ,न लागता साजरे करा .
अजय दिवटे तहसीलदार सिदखेडराजा
………बॉक्स ….
सिंदखेडराजाचे
तहसीलदार अजित दिवटे किनगावराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घुगे ,विद्युत वितरण चे अधिकारी,यांच्या सह पंचायत समितीचे माजी सभापती इरफान अली ,दक्षता समितीचे भाऊराव घिके ,सामजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ गीते ,सरपंच शिवाजीराव झोटे यांनीही मार्गदर्शन केले ,या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी 40 गावातील सरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील ,दक्षता समितीचे सर्व प्रमुख ,पत्रकार यांची उपस्थिती होती .कार्यक्रमांचे प्रास्ताविक ठाणेदार संजय मातोंडकर तर आभार ,परशुवाले यांनी मानले
