केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव करणार 23 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी
Oplus_16777216
बुलडाणा (प्रतिनिधी )अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीची पाहणी ही केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे 23 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत
18 आणि 19ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे शेतकऱ्यांच्या बंधावर जावुन नुकसानीची पाहणी करण्यासाठी 23 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे
चिखली तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत दुपारी 2 वाजता चिखली शहरातील पावसामुळे बाधित झालेल्या घरांची पाहणी त्यानंतर चिखली तालुक्यातील सोमठाणा उत्रादा , पेठ ,बोरगाव काकडे , पांढरदेव , भरोसा भोरसी या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर जावून करणार आहेत
