सिंदखेडराजा येथील शेतकरी श्रीमती अनिता ठाकरे यांची विहीर सततच्या पावसाने कोसळली….

IMG-20250822-WA0039

सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी रवि ढवळे )सिंदखेडराजा येथील शेतकरी श्रीमती अनिता अनिल ठाकरे यांची विहीर सततच्या पावसाने कोसळली असून मोटार व पाईप व वायर हे पूर्णपणे विहिरीत दबलेले आहे याचा पंचनामा करून महसूल प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केली आहे
शेतकरी श्रीमती अनिता ठाकरे यांच्या घरामध्ये कोणीही करता पुरुष नाही अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे स्वतःची मुलगी नववी मध्ये शिकत आहे तर त्यांच्या सासूबाई यांना आठवड्यातून दोनदा डायलेशन करण्यासाठी जालना येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते शेतीव्यतिरिक्त त्यांचा कोणताच व्यवसाय नाही त्यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे अशा मध्येच विहीर सततच्या पावसामुळे कोसळली असल्या कारणाने सदर महिलेवर मोठे संकट कोसळले आहे अशा अवस्थेमध्ये महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी सदर महिलेने केली आहे

You may have missed

error: Content is protected !!