अंढेरा पोलीस स्टेशन यांनी लावला काही तासात चोराचा तपास .

IMG-20250824-WA0007

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली आणि देवळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये आधुनिक यंत्रणेचा वापर करून आरोपी लवकरात लवकर कसा पकडण्यात येईल याचा हातखंड वापरत आहेत रुपेश शक्करगे बुलढाणा येथे एलसीबी मध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक आरोपी हे कसे पकडायचे याचा अनुभव असल्यामुळे ते त्यांच्या सातत्याने गुन्हेगारापर्यंत कसे लवकरात लवकर पोहोचत येईल हे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा अंढेरा पोलीस स्टेशनला होत आहे पोलीस स्टेशन अंढेरा येथे फिर्यादी नामे योगेश बबन आंधळे रा. पिंप्री आंधळे यांनी दि.23 ऑगस्ट2025 रोजी पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार अप क्रमांक 236/2025 कलम 303 (2) BNS प्रमाणे गुन्हा अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला होता आणि तपास सुरू केला सदर गुन्ह्यातील घटनास्थळावरील CCTV फुटेज, मोबाईलचे टॉवर लोकेशन, गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी 1. अमोल उर्फ राहुल उर्फ वांग्या गजानन वाघ वय 24 वर्ष रा. गवळीपुरा, चिखली व एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्याचे जवळील स्कुटी क्रमांक MH 28 BZ 0171 च्या डिकी मध्ये 06 मोबाईल मिळून आले. वरून त्याला मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्याने 02 मोबाईल अंढेरा फाट्यावरील पेट्रोल पंपावरून, 03 मोबाईल देऊळगाव राजा येथून, 01 मोबाईल चिखली येथून चोरी केल्याचे सांगितले. अंढेरा पोलीस स्टेशन यांनी मूद्देमाल एकुण 06 मोबाईल
एक स्कुटी MH28 AZ 0171 जप्त केले आहे
सदरची कामगिरी
मा.श्री निलेश तांबे सा
पोलीस अधिक्षक बुलढाणा,
मा.श्री अमोल गायकवाड सा
अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा
मा.श्रीमती मनिषा कदम मॅडम
SDPO देऊळगाव राजा
यांचे मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि रूपेश शक्करगे पोउपनि सुरेश जारवाल पोह/554 सिध्दार्थ सोनकांबळे पोशि/2604 नितीन फुसे पोशि/1671 किशोर जाधव मपोका/2158 माधुरी इंगळे यांनी केली आहे

You may have missed

error: Content is protected !!