सैलानी येथे अमावस्याला निर्गुण हत्या आरोपी तीनतासात पोलिसांच्या ताब्यात….‌…..

Screenshot_2025-08-24-08-07-00-54_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

चिखली (निलेश कोल्हे )चिखली तालुक्यातील सैलानी येथे ही घटना २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सैलानी बाबा दर्गा परिसरात घडली. अमावास्येनिमित्त सैलानीत नेहमीप्रमाणे यात्रा भरली होती. मृतक बाब्या देखील आपल्या साथीदारांसह यात्रेत आला होता. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केले. यात बाब्याचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत तिघांना अटक केली आहे. यामध्ये अलेक्स इनॉक जोसेफ उर्फ रोनी (रा. सैलानी), शेख सलमान शेख अश्फाक (रा. सैलानी), सय्यद वाजीत सय्यद राजू उर्फ वाजीत टोपी (रा. सैलानी) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपीविरुद्ध या तिघांविरोधात रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 146/2025 भा.दं.वि. (BNS) कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
मृतक शेख नफिज उर्फ बाब्या हा जेबकटारीसह मारहाणीच्या अनेक प्रकरणांत आरोपी होता. त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तडीपारही केले होते. तरीही तो शहरात वावरत होता. त्याच्या खुनामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये दहशत पसरली आहे.पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करुन सदर गुन्हातील तिन्ही आरोपी फरार झाले होते परंतु मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे साहेब , अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड साहेब बुलडाणा,उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा श्री. सुधीर पाटील साहेब,पो. नि.श्री. सुनील आंबूलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश सोळंके ठाणेदार पो. स्टे. रायपूर, सपोनि दुर्गेश राजपूत प्रभारी दहशतवादी विरोधी पथक बुलडाणा सफौ घाटे, पोहेका शितोळे, पोहेका पालवे,पो. ना सुधीर जोशी, पो ना काकडे,पोका राहुल जाधव, पोका अख्तर शेख, पोका कळमकर पोका काझी यांचे पथक तात्काळ रवाना होऊन आरोपी यांचा तांत्रिक विश्लेषणद्वारे शोध सुरु करून नमूद आरोपी व गुन्हात वापरलेली मोटारसायकल यांचा अवघ्या 3 तासात शोध लावून ग्राम माहोरा ता. जाफ्रबाद जि.जालना येथुन
ताब्यात घेतले असून त्यांना गुन्हा बाबत कसून चौकशी केल्याने त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून नमूद आरोपी यांना अटक करून पुढील तपास सपोनि निलेश सोळंके ठाणेदार पो. स्टे. रायपूर, पो का लक्ष्मण शिंदे हे करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!