येणारे सण उत्सव कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करा !उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील …..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत 23 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम देऊळघाट येथे आगामी सण उ ईद-ए-मिलाद, गणपती उत्सव संबंधाने 12.30 वा दरम्यान शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते, सदर शांतता समिती करिता मा. श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब यांनी आगामी सण उत्सव दरम्यान कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता शांततेत पार पाडावा यासंबंधाने मार्गदर्शन केले.

तसेच मिरवणुकीत कोणीही डीजे चा वापर करणार नाहीत, इतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखाविल असे गाणे वाजवू नये, आगामी सण हे जातीय सलोख्यात साजरे करावे, ग्राम देऊळघाट येथील दोन समाजामध्ये मागील काही दिवसा अगोदर आपापसात गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे थोड्या थोड्या कारणामुळे त्यांच्यात वाद-विवाद होत होता, दोन्ही समाजातील लोकांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या तसेच त्याचे दुष्परिणाम सुद्धा समजून सांगितले, त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणला, त्यांचे मन परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी आपसात भांडण तंटा न करण्याचे व यानंतर सलोख्याने राहणार असल्याबाबत वचन घेतले. तसेच गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये गुलालाचा वापर करू नये त्याऐवजी फुल पाकळ्यांचा वापर करावा,

मुस्लिम धर्मियांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मज्जित वरून गणेश उत्सव मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करणार आहोत. तसेच गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकी वेळेवर सुरू करून वेळेत संपवावी, आशा व इतर सूचना देण्यात आल्या. मीटिंग करता 200 नागरिक उपस्थित होते. मीटिंग संपल्यानंतर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब व आम्ही , सोबत ग्रामविकास अधिकारी देऊळघाट, महावितरण चे अधिकारी यांच्यासह गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करून विसर्जन मार्गात येणारे दगड , गिट्टी, विटा रस्त्यातून काढून घेण्याचे तसेच लोबलेले तारा टाईट करण्याच्या सूचना, तसेच मिरवणूक मार्गावर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व लाईटची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या. सदर शांतता समिती मीटिंग करिता मा. श्री अमोल गायकवाड पोलीस अधीक्षक बुलढाणा, मा. श्री सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा,
गजानन कांबळे पोलीस निरीक्षक पोस्ट बुलढाणा ग्रामीण,
मा. श्री संतोष काकडे तहसीलदार चिखली, मा. श्री प्रशांत बिडकर मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली, सपोनि श्री सोळंके ठाणेदार रायपूर, पोलीस स्टेशन चिखलीचे अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस स्टेशन चिखली हद्दीतील शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, गणेश मंडळाचे सदस्य, ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे आयोजक, तसेच पोलीस स्टेशन अमडापुर व रायपूर हद्दीतील शांतता समितीचे सदस्य, असे अंदाजे 250 ते 300 शांतता समितीचे सदस्य व इतर मान्यवर हजर होते. सदर शांतता समितीचे मीटिंग दरम्यान मागील वर्षी गणेश मंडळांनी उत्कृष्ट देखावे व मिरवणुकीचे नियोजन याकरिता प्रोत्साहन समिती तयार करण्यात आली होती त्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या मंडळांना मा पोलीस अधीक्षक सा. बुलढाणा यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला आहे.
