ई-पीक पाहनीतील तांत्रीक अडचणी मध्ये झाली दुरुस्ती;ऍप झाले सुरळीत…विनायक सरनाईक यांनी लावून धरली होती मागणी….भरोसा,रामनगर शिवारातील शेतकऱ्यांची लोकेशन अडचण जैसेथे…

IMG-20250824-WA0034

चिखली( निलेश कोल्हे)शेतकर्‍यांनी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्वतःच्या शेतीवरील पिकांची नोंदणी करायची आहे. शेतकर्‍यांना डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वतःच्या शेतीतील खरीप पिकांची नोंद करावी लागणार आहे. नोंदणी करताना शेतकर्‍यांनी शेतीच्या गट क्रमांकाच्या ५० मीटर परिसरात उभं राहून पिकाचा फोटो घेणे आवश्यक आहे. असे असतांना इ पिक पाहणी ऍप सुरळीत चालत नसल्याने यामध्ये इ पिक पाहणी करतांना अडचणी येत असल्याने तांत्रीक अडचणींचा समस्यांचा पाढा शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी उप विभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेत वाचला होता तेव्हा याबाबत उप विभागीय अधिकारी यांनी इ पिक पाहणीतील तांत्रीक अडचणी सोडवणे संदर्भात संबंधितांना सुचना दिल्या होत्या आता इ पिक पाहणी ऍप सुरळीत चालत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक पेरा भरुण घ्यावे असे आवहाण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मात्र भरोसा, रामनगर शिवारातील शेतकऱ्यांची समस्या अजूनही जै से थे असल्याने नुसता पत्रव्यवहार नकोय इ पिक पाहणीतील लोकेशनची तांत्रीक अडचण कायमस्वरूपी सोडवा अशी मागणी शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी केली असून यावर वेळीत तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांचे भविष्यात नुकसान झाल्यास पिक विमा मिळण्यापासून व इतर योजनेतून शेतकरी वंचीत राहिल्यास यास संबंधित विभाग जबाबदार राहिल असे देखील शेतकऱ्यांनी सांगितले

खरीप हंगामातील पीक पाहणी आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धत संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वतःच्या शेतीतील खरीप पिकांची नोंद करावी लागणार आहे. नोंदणी करताना शेतकर्‍यांनी शेतीच्या गट क्रमांकाच्या ५० मीटर परिसरात उभं राहून पेरणी केलेल्या पिकाचा फोटो घेणे आवश्यक आहे.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाने ई-पीक पाहणी (ई-क्रॉप सर्व्हे) हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धत संपूर्ण राज्यात लागू केली आहे.असे असतांना अनेक अडचणी ई-पीक पाहणी करतांना तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना येत आहे.तालुक्यातील मौजे काळोना, रामनगर येथील शेतकर्‍यांची जमीन मौजे भरोसा भाग-१ व भाग-२ शिवारामध्ये आहे. या शिवारातील शेतकरी ई-पीक पाहणी नोंदणी करावयास शेतात गेल्यास ई-पीक पाहणी डिजिटल एॅपमध्ये मात्र लोकेशन हे १०हजार ते २०हजार मिटर लांब असलेले भोरसा भोरसी शिवारातील दाखवत असल्याने
यामुळे शेतकर्‍यांची ई-पीक पाहणी होत नसल्याने शेतकर्‍यांना अडचण निर्माण झाली आहे.हि समस्या सुटत नसल्याने
मौजे काळोना येथील शेतकर्‍यांसह विनायक सरनाईक, यांनी या प्रकरणी उप विभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेत इ पिक पाहणीतील तांत्रीक अडचणी त्यांच्याकडे मांडल्या होत्या.याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व भुमि अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार झाल्यानंतर आता इ पिक पाहणी ऍपमध्ये सुधारणा झाली आहे.मात्र
मौजे काळोना येथील भरोसा भाग १ व २ मधील शेतकर्‍यांची ई-पीक पाहणी नोंदणी करतांना येत असलेली तांत्रिक अडचण दूर झाली नसल्याने या समस्या कायमस्वरूपी सोडवा अशी मागणी होत आहे.

अडचणी सुटण्यासाठी तहसिलदारांनी केला संबंधीत विभागास पत्रव्यवहार…

मौजे भरोसा भाग १, भरोसा भाग २. रामनगर येथील शेतकरी यांना ई-पिक पाहणी करत असताना LOCATION संबंधी अडचणी येत आहेत. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिक पाहणी करण्यास गेल्यास त्यांना सदर गट 10 हजार ते 20 हजार मीटर लांब असल्याबाबत सूचना ई-पिक पाहणी करताना येत आहे.सदरील ऍप सुरळीत चालत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत तांत्रीक अडचणीचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे व शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवावी असे पत्र तहसिलदार यांनी उपजिल्हाधिकारी तथा डी डी ई बुलढाणा यांना काढले होते.आता इ पिक पाहणी ऍप सुरळीत चालत असली तरी भरोसा, रामनगर शिवारातील शेतकऱ्यांची अडचण जै से थे आहे.

भुमि अभिलेख कार्यालयाकडे सुधारणा करण्याची जबाबदारी…

लोकेशन अडचण सोडवणे संदर्भात यापूर्वी भुमि अभिलेख कार्यालयाकडे महसुल विभागाने अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला या प्रकरणी सुधारणा करणे संदर्भात कारवाई सुरू असल्याचे भुमि अभिलेख कार्यालयाकडून सांगितले जात आहे.मात्र प्रत्यक्षात कारवाई होणार का? शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा प्रशासनाच्या चुकीमुळे २५कि मी अंतरावरील गावात जाऊन इ पिक पाहणी करावी लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

पिक विमा क्लेम कराव कसा? शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल…

शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास ७२तासाच्या आत नुकसानीचे फोटो पिक विमा कंपनीच्या ऍपवर अपलोड करावे लागतात यामुळे या कॅम्पमध्ये सुधारणा न झाल्यास या भरोसा
शिवारात पिक नुकसान झाल्यास आणि लोकेशन अभावी नुकसानीचे क्लेम शेतकरी न करु शकल्यास या नुकसानीस व शासकीय योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहल्यास यास प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तर तेव्हा जर भरोसा शिवारात शेतीपीक पुर्णतः हा नुकसान झाली आणि भोरसा शिवारात थोड्या प्रमाणात नुकसान असल्यास फोटो अपलोड करायचे कसे?आणि या प्रशासनाच्या तांत्रीक चुकीमुळे पिक विमा मिळेल कसा? यापुर्वीच्या पिक विम्यापासून या शिवारातील शेतकरी वंचीत राहले होता.इ पिक पाहणी लोकेशन दुरुस्ती न झाल्यास प्रशासन जबाबदार राहिल असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला आहे

You may have missed

error: Content is protected !!