इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे 19 वर्षांपासून प्रशिक्षण. विद्या निकेतन इंग्लीश स्कुल,महार चिकणा
लोणार (एकनाथ माळेकर) लोणार तालुक्यातील मौजे महारचिकणा,व्यक्ती तितक्या प्रकृती माणूस म्हटला की त्याला कोणता ना कोणता छंद असतो. मेहकर येथील कलाध्यापक रामेश्वर तोंडे यांना शाडूच्या मातीपासून विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्ती घडवण्याचा छंद गत अनेक वर्षांपासून आहे. ते आपल्या या छंदाचा व्यवसाय म्हणून उपयोग करत नाहीत, तर विद्यार्थ्यांना, शिक्षकांना देखील पर्यावरण पूरक शाडूच्या माती पासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री संतोषजी ढाकणे सर, उपस्थित शिक्षक, विद्यार्थी, इतर कर्मचारी होते.
दरवर्षी रामेश्वर तोंडे यांना बुलढाणा जिल्हात विविध शाळा कॉलेजमधून या इको फ्रेंडली शाडूच्या गणेश मर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. त्या आमंत्रणाचा ते स्वीकार करत ते विविध शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी पन्नास हजार वर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण दिले आहेत त्यांच्या या प्रशिक्षणाचा अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी फायदा घेत आपल्या घरीच गणपतीची मूर्ती बनवून त्याची ते स्थापना करत आहेत.
गणेश मूर्ती टब किंवा गंगाळात विसर्जन करा
संपूर्ण गणेशोत्सव इको फ्रेंडली असावा करीता ध्वनी, वायू व जल प्रदुषण होऊ नये या करता रामेश्वर तोंडे कलाशिक्षक कार्यशाळेत उपस्थित होते. कार्यशाळेतील उपस्थित पर्यावरण प्रेमींना आवाहन करत असतात. आपण स्थापन केलेल्या गणरायाचे विधिवत विसर्जन झाले पाहिजेत करीता घरगुती पध्दतीने गणरायाची मूर्ती टब किंवा गंगाळात विसर्जन करू माती तथा निर्माल्य कुंड्या मधील झाडांना टाकावे मार्गदर्शन केले.
