मेरा खुर्द , मेरा बू, कोलारा, शेळगाव आटोळ,मंडळात शेती व फळबागेची मोठे नुकसान, शेती पाण्याखाली येऊन पिकांची झाली नासाडी शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा. गजानन वायाळ यांनी केली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पिक नुकसानीची मागणी .

IMG-20250827-WA0003

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मेरा खुर्द महसूल मंडळ मध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे परंतु महसूल विभागाने कृषी विभाग यांनी कोणत्याही प्रकारचे पंचनामे या भागांमध्ये आजपर्यंत सुरू केले नाही त्यामुळे मेरा खुर्द महसुल मंडळातील शेतकरी संतप्त होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याकडे आपली कैफियत मांडली आणि त्यांनी क्षणाचा विलंब ना लावता आसोला येथील गट नंबर 326 रिहाना बी शेख निसार यांचे 2ऐकर पपई बागची नुकसान झाले आहे. गजानन वायाळ शेतामध्ये जाऊन पपई पिकाची पाहणी केली व तिथूनच चिखली महसूलचे तहसीलदार संतोषजी काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली तसेच चिखली तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांच्याशी सुद्धा चर्चा करून या भागातील पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त भागाची सर्वे करण्यात यावे सर्वे करण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे तसेच भरोसा शिवारातील राजीव भालचंद्र चव्हाण गट नंबर 223 भाग 2 येथील 5ऐकर पपई पिकाची सुद्धा अतोनात नुकसान झाली आहे भरोसा भाग 2येथील गट नंबर 223 मध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून फळ पिकाची लागवड राजीव चव्हाण यांनी केली होती परंतु त्यामध्ये आसमानी आणि सुलतानी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागेचे पूर्ण नुकसान झाले आहे आज शेतकरी हा हावाल दिल झाला आहे आणि मेरा खुर्द महसुल मंडळ हा भाग अतिवृष्टीच्या क्षेत्रामधून सोडण्यात आल्याची चर्चा असल्यामुळे शेतकरी हा हावाल दिल झाला आहे या भागामध्ये सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे परंतु मेरा खुर्द महसूल मंडळांमधील कोणत्याही प्रकारचे सर्वे ग्राम महसूल अधिकारी व कृषी विभाग करताना दिसून येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ग्राम महसुल अधिकारी व कृषी कर्मचारी यांच्यावर नाराजी दिसून येत आहे या वेळी असोला बु परिसरातील अनेक शेतकरी गजानन वायाळ यांच्या सोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात हजर होते

You may have missed

error: Content is protected !!